हरिश्चंद्र : हरिश्चंद्र गडावर एका प्रसिध्द वाटाड्याचा तोल जाऊन मृत्यू झाल्याची दुःखद घटना आज (ता. ७) घडली आहे. सावळेराम बादड उर्फ सावळा वय (अंदाजे ४० वर्ष) असे या व्यक्तीचे नाव असून कड्यावरून चालत असताना त्यांचा तोल खाली गेला त्यात त्यांचा मृत्यू झाला आहे. त्यांच्या या निधनाने हळहळ व्यक्त केली जात आहे.
सावळेराम बादड उर्फ सावळा हे अकोले तालुक्यातील पाचने येथील रहिवासी होते, सावळा हे अत्यंत दुर्गम ठिकाणी छोटे हॉटेल चालवून आपला उदरनिर्वाह करत होते.
सावळा यांनी हरिश्चंद गडावर अनेक नवनवीन प्रेक्षणीय ठिकाणे शोधुन काढून पर्यटकांना ती दाखवली होती. येथे ट्रेकींगसाठी येणाऱ्या पर्यटकांचा जवळचा आणि हक्काचा माणूस गेल्याची भावना व्यक्त केली जात आहे, या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.