Monday, May 6, 2024
HomeNewsचाकण येथील डायचांग इंडिया सीट कामगारांचे पिंपरीत प्राणांतिक उपोषण सुरू ; ...

चाकण येथील डायचांग इंडिया सीट कामगारांचे पिंपरीत प्राणांतिक उपोषण सुरू ; 16 कामगार रुग्णालयात

व्यवस्थापन आणि ठेकेदारांची कामगारांना मारहाण जीवे मारण्याची धमकी

पिंपरी चिंचवड/क्रांतिकुमार कडुलकर
: डायचंड इंडिया सीट कंपनीतील 123 कामगार गेली पाच दिवस प्राणांतिक उपोषणाला बसले असून, त्यापैकी 16 कामगारांना प्रकृती बिघडल्यामुळे यशवंतराव चव्हाण रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यापैकी काहींचे प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते. मात्र या संदर्भात प्रशासन अद्याप डोळे झाकून असून या कामगारांच्या प्रश्नाकडे लक्ष देण्यास कोणीही नाही.

डायचंड इंडिया सीट कंपनी चाकणस्थीत असून या कोरियन कंपनीमध्ये महिंद्राच्या गाड्यांचे आसन तयार करण्याचे काम चालते गेल्या बारा वर्षात या कंपनीत एकही कायम कामगार नसून सर्व कामगार कंत्राटी म्हणून भरण्यात आले आहेत.
या कामगारांच्या प्रश्नाबाबत राज्यातील झुंजार कामगार नेते यशवंतभाऊ भोसले यांनी सांगितले की, कंपनीमध्ये आज पागल आहेत कंत्राटी कामगार व शिकाऊ कामगार म्हणूनच कामगारांची भरती केली आहे कामगारांना कोणत्याही सोयी सवलती दिल्या जात नसून अद्याप पावतो कोणतीही पगारवाढ देण्यात आलेले नाही याबाबत कंपनी प्रशासनाशी बोलण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी कोणताही प्रतिसाद दिला नाही त्यामुळे येथे राष्ट्रीय श्रमिक आघाडीची युनियन स्थापन करून कामगारांच्या मागण्या संदर्भात लढा पुकारला आहे.

कंपनीत राष्ट्रीय श्रमिक आघाडीची युनियन स्थापन होतात कंपनीचे ठेकेदार प्रभू शिंदे यांनी कामगारांना व्यक्तिगत होत्या बोलवून धमकी देण्यास सुरुवात केली होती कंपनीचे प्रकल्प प्रमुख राहुल गायकवाड यांनी कामगारांना जीवे मारण्याची धमकी दिली होती तर कंपनीतील कामगार राकेश ठाकूर यांना व्यवस्थापनाच्या लोकांनी बेदम मारहाण केली होती या संदर्भात महाळुंगे पोलीस चौकी मध्ये तक्रार दिली असतानाही पोलिसांनी त्याची योग्य ती दखल घेतली नाही याबाबत पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांच्या नजरेस ही बाब आणून दिल्यानंतर त्यांनी केवळ तोंडाला पाने पुसण्याची कामे केली. यामुळे कंपनीतील 123 कामगारांनी पिंपरी चौकातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ दिनांक 23 नोव्हेंबर पासून प्राणांतिक उपोषणाला सुरुवात केली आहे. कंपनीतील गुंड प्रवृत्तीच्या व्यवस्थापनावर जोपर्यंत कारवाई केली जात नाही व या कामगारांना कायम केले जात नाही तोपर्यंत हे प्राण्यांतिक उपोषण चालू असणार असल्याची माहिती यशवंत भोसले यांनी दिली.

या कामगारांपैकी सोळा कामगारांची प्रकृती बिघडली असून त्यांना यशवंतराव चव्हाण हॉस्पिटल मध्ये दाखल करण्यात आले आहे त्यापैकी काही कामगार चिंताजनक स्थितीत असल्याचे समजते. गेल्या पाच दिवसात हे उपोषण चालू असतानाही प्रशासनाने कोणतीही दखल घेतली नसल्याची माहिती कामगार नेते यशवंत भोसले यांनी दिली आहे.

Lic
Lic
संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय