Sunday, May 19, 2024
Homeराज्यआयआयटी मुंबई समोर विविध संघटनांची निदर्शने, दर्शन सोलंकी प्रकरणातील दोषींवर कारवाई करा

आयआयटी मुंबई समोर विविध संघटनांची निदर्शने, दर्शन सोलंकी प्रकरणातील दोषींवर कारवाई करा

मुंबई : दर्शन सोलंकी प्रकरणात तातडीने अॅट्रॉसिटी अॅक्ट अंतर्गत दोषीं विरोधात गुन्हा दाखल करण्यात यावा, व अन्य मागण्यांसाठी आज आयआयटी च्या गेट समोर स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडिया, जाती अंत संघर्ष समिती, जनवादी महिला संघटना, दलित पँथर समन्वय समिती, सीटू आणि रोहिदास समाज संघटना आदी सुमारे २०० पेक्षा अधिक लोकांनी तीव्र निदर्शने केली.

मुंबई : दर्शन सोलंकी प्रकरणात तातडीने अॅट्रॉसिटी अॅक्ट अंतर्गत दोषीं विरोधात गुन्हा दाखल करण्यात यावा, व अन्य मागण्यांसाठी आज आयआयटी च्या गेट समोर स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडिया, जाती अंत संघर्ष समिती, जनवादी महिला संघटना, दलित पँथर समन्वय समिती, सीटू आणि रोहिदास समाज संघटना आदी सुमारे २०० पेक्षा अधिक लोकांनी तीव्र निदर्शने केली.आयआयटी प्रशासनाच्या विरोधात निषेधार्थ घोषणा देण्यात आल्या. या निदर्शनात एस एफ आय चे कबीर जाधव, नताशा दराडे, ओसामा, रामदास, प्रिनी शिवानंद, प्रोग्रेसिव्ह स्टुडंट्स फोरम फातिमा सुलताना, ओरकोदास, जाती अंत संघर्ष समिती चे काॅ. शैलेंद्र कांबळे, काॅ. सुबोध मोरे, काॅ.सुगंधी, काॅ. हरी घाडगे, जनवादी महिला संघटनेचे रेखा देशपांडे, माधुरी वर्मा, काॅ. संगीता सोनावणे, डि वाय एफ आय आय चे अध्यक्ष महेंद्र उघडे, संजीव शामंतूल, तबरेज सय्यद, लक्षमी शामंतूल, रत्ना वाघमारे, सीटू चे डॉ. विवेक माॅंटेरो, डॉ.एस. के.रेगे, काॅ कमल रावत, बुक्टूच्या डॉ. स्वाती लावंड, लोक सांस्कृतिक मंच चे प्रमोद नवार, बांधकाम नाका कामगार युनियन चे शैलेंद्र चव्हाण आदी उपस्थित होते.यावेळी आंदोलनकांनी दर्शन सोलंकी प्रकरणात तातडीने अॅट्रॉसिटी अॅक्ट अंतर्गत दोषीं विरोधात गुन्हा दाखल करण्यात यावा, आय आय आय टी ने स्वतंत्र अशी समिती नेमावी व ज्यात बाहेरील सामाजिक संघटनाच्या प्रतिनिधींचा सहभाग असावा व निःपक्षपातीपणे चौकशी करावी, आणि पिडीत दर्शन सोलंकी च्या कुटुंबियांना आर्थिक मदत करावी,  या निदर्शनात महाराष्ट्र शासनाच्या एकाही मंत्र्यांनी भेट दिली नाही याचा निषेध करण्यात आला.

आयआयटी प्रशासनाच्या विरोधात निषेधार्थ घोषणा देण्यात आल्या. या निदर्शनात एस एफ आय चे कबीर जाधव, नताशा दराडे, ओसामा, रामदास, प्रिनी शिवानंद, प्रोग्रेसिव्ह स्टुडंट्स फोरम फातिमा सुलताना, ओरकोदास, जाती अंत संघर्ष समिती चे काॅ. शैलेंद्र कांबळे, काॅ. सुबोध मोरे, काॅ.सुगंधी, काॅ. हरी घाडगे, जनवादी महिला संघटनेचे रेखा देशपांडे, माधुरी वर्मा, काॅ. संगीता सोनावणे, डि वाय एफ आय आय चे अध्यक्ष महेंद्र उघडे, संजीव शामंतूल, तबरेज सय्यद, लक्षमी शामंतूल, रत्ना वाघमारे, सीटू चे डॉ. विवेक माॅंटेरो, डॉ.एस. के.रेगे, काॅ कमल रावत, बुक्टूच्या डॉ. स्वाती लावंड, लोक सांस्कृतिक मंच चे प्रमोद नवार, बांधकाम नाका कामगार युनियन चे शैलेंद्र चव्हाण आदी उपस्थित होते. 

यावेळी आंदोलनकांनी दर्शन सोलंकी प्रकरणात तातडीने अॅट्रॉसिटी अॅक्ट अंतर्गत दोषीं विरोधात गुन्हा दाखल करण्यात यावा, आय आय आय टी ने स्वतंत्र अशी समिती नेमावी व ज्यात बाहेरील सामाजिक संघटनाच्या प्रतिनिधींचा सहभाग असावा व निःपक्षपातीपणे चौकशी करावी, आणि पिडीत दर्शन सोलंकी च्या कुटुंबियांना आर्थिक मदत करावी,  या निदर्शनात महाराष्ट्र शासनाच्या एकाही मंत्र्यांनी भेट दिली नाही याचा निषेध करण्यात आला.

Lic
संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय