Mithun Chakraborty : 70 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्यामध्ये ज्येष्ठ अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांना त्यांच्या सिनेविश्वातील योगदानाबद्दल दादासाहेब फाळके पुरस्कार पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. 1976 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘मृगया’ या चित्रपटातून मिथुन चक्रवर्ती यांनी आपल्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली होती.
8 ऑक्टोबर 2024 रोजी पार पडणाऱ्या 70 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्यामध्ये हा पुरस्कार प्रदान केला जाईल. केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी एक्स प्लॅटफॉर्मवर पोस्ट शेअर करत दादासाहेब फाळके पुरस्कारासंदर्भात ही अधिकृत घोषणा केली आहे.
मिथुन चक्रवर्ती (Mithun Chakraborty) यांनी आपल्या कारकिर्दीमध्ये 350 हून अधिक सिनेमांमध्ये काम केले असून त्यांनी निर्मिती क्षेत्रातही काम केले आहे. तसेच सध्या मिथुन चक्रवर्ती राजकारणात विशेष सक्रिय आहेत. याशिवाय त्यांनी तीन वेळा राष्ट्रीय पुरस्कारावर नाव कोरले असून दोन वेळा फिल्मफेअर पुरस्कारही जिंकला आहे.
हेही वाचा :
मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण’ योजनेचा तिसरा हप्ता २९ सप्टेंबरपासून मिळणार
मुंबई विद्यापीठ सिनेट निवडणुकीत युवासेनेचा विजय, आदित्य ठाकरेंचा दबदबा कायम
महाविद्यालयाच्या आवारात युवतीवर अत्याचार, चार महाविद्यालयीन युवकांवर गुन्हा दाखल
संजय राऊत यांना कोर्टाकडून 15 दिवस कैद, 25 हजारांचा दंड
मेट्रोच्या मॅनहोलमध्ये पडून महिलेचा मृत्यू, नागरिकांचा संताप
धक्कादायक : सासरच्या लोकांनी घरातच केला गर्भपात, आई आणि बाळ दोघांचा मृत्यू
भयानक : कोल्ड ड्रिंकमध्ये गुंगीचं औषध मिसळून 22 वर्षांच्या तरुणीवर सामूहिक अत्याचार
अक्षय शिंदेच्या मृतदेहाचे दहन न करता पुरण्याचा निर्णय, स्थानिकांचा विरोध
मोठी बातमी : बदलापूर अत्याचार प्रकरणातील मुख्य आरोपी अक्षय शिंदेचा एन्कांऊटर