Saturday, October 5, 2024
Homeजिल्हाChakan : चाकण औद्योगिक क्षेत्रातील सर्वाधिक वेतनवाढ करार

Chakan : चाकण औद्योगिक क्षेत्रातील सर्वाधिक वेतनवाढ करार

Chakan : चाकण औद्योगिक वसाहती मधील निघोजे येथील इंटरनॅशनल ऑटोमोटिव्ह कंपोनंट्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेड प्लांट 1 निघोज, प्लांट 2 महाळुंगे चाकण आणि स्वाभिमानी श्रमिक कामगार संघटना यांच्यामध्ये हॉटेल कलासागर, कासारवाडी, नाशिकफाटा, येथे झालेल्या चौथ्या वेतनवाढ करारावरती संघटनेचे प्रमुख सल्लागार आमदार महेश लांडगे, रोहिदास गाडे,  संघटनेचे अध्यक्ष व झुंजार कामगार नेते जीवनशेठ येळवंडे, व कंपनीचे मॅनेजिंग डायरेक्टर सुनील कोपरकर यांच्या प्रमुख उपस्थितीत सोमवार दिनांक ३०/०९/२०२४ रोजी सह्यांचा कार्यक्रम संपन्न झाला. (Chakan)

करारामध्ये झालेले ठळक मुद्दे खालील प्रमाणे 

०१) एकूण पगारवाढ – २१३००/- ( एकवीस हजार तीनशे रुपये )

पगाराचा रेशो – पहिल्या वर्षी ६०% दुसऱ्या वर्षी २०% तिसऱ्या वर्षी २०% मिळणार.

०२) कायम नोकरी – संघटनेच्या सभासद झालेल्या कंत्राटी कामगारांपैकी ६५ कामगारांना कंपनी रोलवर घेऊन कायम नोकरी देण्याचे ठरले आहे. रोलवर आलेल्या सभासद कामगारांना  २५००/- पगार वाढ मिळणार आहे. तसेच उर्वरित कंत्राटी सभासद कामगारांना १२५०/- रुपये पगारवाढ देण्याचे ठरले आहे. तसेच उर्वरीत कामगारांना पुढील करारामध्ये कायम करण्याचे आश्वासन व्यवस्थापनाने दिले आहे.

०३) कराराचा कालावधी – ०१/०४/२०२४ ते ३१/३/२०२७ असा तीन वर्षांचा राहील.

०४) मेडिक्लेम पॉलीसी:- कुटुंबातील एका व्यक्तीस ३०००००/- रुपये या प्रमाणे चार व्यक्तींसाठी १२०००००/- रुपयांची पॉलिसी राहणार आणि बफर प्रत्येक व्यक्तीला  ३०००००/- या प्रमाणे  (१२०००००+१२०००००) संपूर्ण खर्च कंपनी करणार या पॉलिसी मध्ये स्वतः, पत्नी, आणि मुले  यांचा समावेश करण्यात येणार आहे. (Chakan)

०५) मृत्यू साहाय्य योजना

अ) एखाद्या कामगाराचा दुर्देवी मृत्यू झाल्यास सर्व कामगारांच्या एक दिवसांच्या पगार जमा करून त्या जमा होणाऱ्या रकमेच्या दुप्पट रक्कम कंपनी त्यामधे टाकणार व तो मोबदला कंपनीकडून कायदेशीर वारसास मिळणार.

०६) ग्रुप एक्सीडेंट पॉलिसी:-

मासिक ग्रॉस पगाराच्या ७२ पट एवढी रक्कम कंपनीकडून वारसदारास देण्यात येईल.

०७) टर्म इन्शुरन्स पॉलीसी:-

जर एखाद्या कामगाराचा कंपनीमध्ये किंवा कंपनी बाहेर नैसर्गिक अथवा अपघाती मृत्यू झाल्यास त्या कामगाराच्या वारसास वार्षिक ग्रॉस पेमेंटच्या ४ (चार) पट एवढी रक्कम मिळेल.

०८) सूटया :-

A) PL – २१

(२४० दिवसांना १५ आणि  नंतर प्रत्येकी १० दिवसांना ०१ सुट्टीची वाढ याप्रमाणे राहील)

B) SL – १२

C)CL-१२

C) PH – ११

E) मतदानाची सुट्टी:- सरकारी आदेशानुसार राहील,

०९) दिवाळी बोनस:- सर्व कामगारांना दिवाळी बोनस हा पगाराच्या २०%  या प्रमाणे देण्यात येईल. 

१०) मासिक हजेरी बक्षीस: ज्या कामगाराचे प्रत्यक्ष कामाचे पूर्ण दिवस भरतील त्या कामगारास मासिक हजेरी बक्षीस म्हणून १०००/ ( हजार ) रुपये देण्यात येईल.

११) पगाराची उचल :- पगाराची उचल म्हणून प्रत्येक कामगारास महिन्याचे दोन पगारा इतकी रक्कम देण्याचे मान्य करण्यात आले आहे. परत फेड ही पुढील समान तीन महिन्यांत करण्याचे ठरले.

१२) शैक्षणिक कर्ज:-

उच्चशिक्षणासाठी बिनव्याजी 1 लाख देण्याचे मान्य केले

१3) वार्षिक स्नेह संमेलन:-

सर्व कामगारांचे सहकुटुंब वार्षिक स्नेहसंमेलन प्रत्येक वर्षी सुधारीत पद्धतीने घेण्याचे ठरले आहे.

१४) ड्रेस 

a) पूर्ण ड्रेस – २, एक टी शर्ट

 b) उच्च प्रतीचा शूज – १ जोड.

C) एक उच्च प्रतीची ऑफिस बॅग 

D) दरवषी एक रेनकोट 

E) हिवाळी जर्किंग तीन वर्षातून एकदा

१५) रात्रपाळी भत्ता:- पर नाईट. ११०/- रुपये इतका करण्यात आला आहे.

१६) बदलता महागाई भत्ता:-

सरकारी नियमानुसार  देण्यात येईल

१७) गुणवंत कामगार – दरवर्षी प्लांट १ व प्लांट २ च्या  दोन कामगारांना दहा हजार रुपये रोख स्वरूपात पारितोषिक दिले जाईल.

१८) सेवा बक्षीस:-

A) पाच वर्षे सर्विस झालेल्या कामगारांना ५००० रुपये रक्कम रोख स्वरूपात देण्यात येईल. 

B) दहा वर्षे सर्विस झालेल्या कामगारांना १२५०० रुपये रोख रक्कम देण्यात येईल. 

C) पंधरा वर्षे सर्विस झालेल्या कामगारांना १५००० रुपये रोख रक्कम देण्यात येईल.

१९) प्रत्येक कामगाराला प्रत्येकी ६ महिन्याचा फरक सप्टेंबर महिन्याच्या पगारामध्ये देण्यात येणार आहे. (Chakan)

करारावरती संघटनेच्या वतीने प्रमुख सल्लागार भोसरी विधानसभेचे कार्यसम्राट आमदार महेश लांडगे, प्रमुख सल्लागार रोहिदास गाडे, कामगार नेते संघटनेचे अध्यक्ष जीवनशेठ येळवंडे, सरचिटणीस कृष्णा रोहोकले,चिटणीस रघुनाथ मोरे, खजिनदार अमृत चौधरी, प्रशांतआप्पा पाडेकर, राजू बोत्रे, संजय पाटील, महादेव येळवंडे, रविंद्र भालेराव, दत्तात्रय गवारे, भट्टू पाटील, कुंदन सोनवणे, संजय बधाले, बाबुराव पोते, दत्ता कांदळकर, आणि सर्व नाशिक युनिट प्रतिनिधी, आय.ए. सी. नाशिक एच. आर. श्रीकांत पाटील, आय.ए.सी. प्लांट १ चे युनिट प्रतिनिधी व युनिटअध्यक्ष सचिन लांडगे, प्रविण गव्हाणे, विनोद दौंडकर, अमित दुधाणे, धनंजय झापर्डे, प्लांट २ चे प्रतिनिधी व युनिट अध्यक्ष उमेश वाडेकर, चेतन हूले, गणेश  पापरे, आणि व्यवस्थापनाच्या वतीने कंपनीचे मॅनेजिंग डायरेक्टर सुनील कोपरकर, एच.आर.डायरेक्ट इंडिया हेड दिपाली खैरनार, डी जी एम एच आरअनिकेत निलेकर, रिजनल मॅनेजर इंडस्ट्रिअल रिलेशन अनिल कुंभार, एच.आर सिनिअर मॅनेजर महेश सावंत, प्लांट१ चे प्लांट हेड पवन मालशे साहेब, सीनियर मॅनेजर प्रोडक्शन हेड विश्वनाथ पाटील, प्लांट एच. आर. मयूर पाटील, प्लांट २ चे प्लांट हेड सिनोज मॅथ्यू, डीजीएम प्रोडक्शन हेड योगेश साळुंखे, एच आर पृथ्वीराज देसाई, यांनी करारावर सह्या केल्या.

संघटनेच्या वतीने प्रमुख सल्लागार भोसरी विधानसभेचे कार्यसम्राट आमदार महेशदादा लांडगे, कंपनीचे मॅनेजिंग डायरेक्टर सुनील कोपरकर साहेब, कामगार नेते अध्यक्ष जीवनशेठ येळवंडे, सरचिटणीस कृष्णा रोहोकले, व कंपनी एच.आर. डायरेक्टर इंडिया हेड दीपाली खैरनार, यांनी उपस्थित कामगार बंधू व व्यवस्थापन यांना मोलाचे मार्गदर्शन केले, प्रास्ताविक आय. आर अनिल कुंभार साहेब यांनी केले, तसेच सूत्रसंचालन सौ. पुजाताई थिगळे यांनी केले, व खजिनदार अमृत चौधरी यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानून कार्यक्रमाचा समारोप केला. कामगारानी डिजेच्या तालावर नाचून, पेढे वाटून फटाक्याची अतिषबाजी करुण आनंद व्यक्त केला. (Chakan)

(Chakan)

संबंधित लेख

लोकप्रिय