Dombivli crime : ठाणे जिल्ह्यातील डोंबिवली येथे एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका 73 वर्षीय महिलेला लग्नाचे आमिष दाखवून 57 लाखांहून अधिक रकमेची फसवणूक झाली आहे. या प्रकरणात 62 वर्षीय व्यक्तीवर फसवणूक आणि चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना विष्णूनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीत घडली असून, पोलिसांनी तपास सुरू केला आहे. (हेही वाचा : वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरण : आरोपींच्या वकिलांचा वैष्णवीचे चारित्र्यहनन करणारे युक्तिवाद)
मिळालेल्या माहितीनुसार, डोंबिवलीतील नाना शंकरशेट रोड येथील एका निवासी संकुलात राहणाऱ्या 73 वर्षीय महिलेची एका 62 वर्षीय व्यक्तीशी ओळख झाली. ही ओळख एका वृत्तपत्रातील वैवाहिक जाहिरातीच्या माध्यमातून झाली होती. आरोपीने महिलेला लग्नाचे वचन देत पुण्यात एकत्र राहण्यासाठी घर घेण्याचे आश्वासन दिले. या आमिषाने प्रभावित होऊन महिलेने आपले घर विकले आणि आरोपीला 57.4 लाख रुपये किमतीचे सोने आणि रोख रक्कम दिली. मात्र, आरोपीने बनावट कागदपत्रांचा वापर करून महिलेची फसवणूक केली. (हेही वाचा : ‘ईडीने सर्व मर्यादा ओलांडल्या’ सर्वोच्च न्यायालयाचा ईडीवर संताप)
पोलिसांचा तपास आणि कारवाई | Dombivli crime
विष्णूनगर पोलिसांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे. या घटनेची माहिती विष्णूनगर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय पवार यांनी दिली. त्यांनी सांगितले की, आरोपीविरुद्ध फसवणूक आणि चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी तपास सुरू केला असून, आरोपीचा शोध घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत. (हेही वाचा : पनवेल महानगरपालिका अंतर्गत भरती, थेट मुलाखतीद्वारे निवड)
तसेच, आरोपीने महिलेला भेटण्यापूर्वी त्याने वैवाहिक जाहिरातीतून संपर्क साधला होता. पोलिसांनी बनावट कागदपत्रांचा तपास सुरू केला असून, आरोपीच्या पार्श्वभूमीची माहिती गोळा करण्याचे काम सुरू आहे. अशी माहिती पोलिसांनी दिली. (हेही वाचा : हायवेवर कार थांबून भाजप नेत्याचे महिले सोबत शारिरीक संबंध, व्हिडिओ व्हायरल)