जुन्नर (आनंद कांबळे) : हिंदी भाषा ही जगातील सर्वाधिक लोकप्रिय भाषा असून जागतिकीरणाच्या युगात तिचे महत्त्व दिवसेंदिवस वाढत चालले आहे,असे प्रतिपादन प्रा.डाँ.बाबासाहेब माने यांनी केले.श्री.शिव छत्रपती महाविद्यालय जुन्नर(Junnar)येथे कनिष्ठ महाविद्यालय विभागातर्फे आयोजित हिंदी दिवस समारंभामध्ये ते बोलत होते.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कनिष्ठ महाविद्यालयाचे माजी हिंदी विभाग प्रमुख प्रा.पद्माकर तांबे हे उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानावरून बोलताना प्रा.तांबे यांनी हिंदीचे महत्व विशद करताना हिंदी ही केवळ मनोरंजनाची भाषा राहिली नसून ती आज रोजगाराची भाषा बनल्याचे प्रतिपादन केले.,कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना प्रा.ज्ञानेश्वर सोनार यांनी हिंदी भाषेचा इतिहास विशद करताना हिंदीचे स्वातंत्र्य लढ्यातील योगदान व जनमानसातील स्थान स्पष्ट केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन प्रा.पूनम मनसुख यांनी तर प्रमुख पाहुण्यांचा परिचय प्रा.योगेश घोडके यांनी करून दिला.(Junnar)
या कार्यक्रमास अध्यक्ष प्रतिनिधी प्रा विलास कुलकर्णी,महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ महादेव वाघमारे, कनिष्ठ महाविद्यालयाच्या समन्वियका प्रा. प्रतिभा लोढा, पर्यवेक्षक प्रा. समीर श्रीमंते यांनी शुभेच्छा दिल्या.कार्यक्रमास कला विभाग प्रमुख प्रा. राजेश कांबळे, विज्ञान विभाग प्रमुख प्रा.संजय इंगळे, प्रा.रेखा गायकवाड, प्रा.विकास वाघमारे व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
हिंदी दिवसानिमित्त निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये पुढील विद्यार्थ्यांनी यश संपादन केले. प्रथम क्रमांक- कु.सूर्यजा प्रमोद माने,द्वितीय क्रमांक-कु. शर्वरी प्रवीण मंचरकर, तृतीय क्रमांक-कु.गौरी गणपत खिलारी तर उत्तेजनार्थ क्रमांक कु.आरोही मंगेश थोरवे या विद्यार्थ्यांनी संपादित केला.
Junnar
हेही वाचा :
मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण’ योजनेचा तिसरा हप्ता २९ सप्टेंबरपासून मिळणार
मुंबई विद्यापीठ सिनेट निवडणुकीत युवासेनेचा विजय, आदित्य ठाकरेंचा दबदबा कायम
महाविद्यालयाच्या आवारात युवतीवर अत्याचार, चार महाविद्यालयीन युवकांवर गुन्हा दाखल
संजय राऊत यांना कोर्टाकडून 15 दिवस कैद, 25 हजारांचा दंड
मेट्रोच्या मॅनहोलमध्ये पडून महिलेचा मृत्यू, नागरिकांचा संताप
धक्कादायक : सासरच्या लोकांनी घरातच केला गर्भपात, आई आणि बाळ दोघांचा मृत्यू
भयानक : कोल्ड ड्रिंकमध्ये गुंगीचं औषध मिसळून 22 वर्षांच्या तरुणीवर सामूहिक अत्याचार
अक्षय शिंदेच्या मृतदेहाचे दहन न करता पुरण्याचा निर्णय, स्थानिकांचा विरोध
मोठी बातमी : बदलापूर अत्याचार प्रकरणातील मुख्य आरोपी अक्षय शिंदेचा एन्कांऊटर
अक्षय शिंदेचा पोस्टमार्टम रिपोर्ट, अति रक्तस्रावामुळे मृत्यू
धक्कादायक : बेंगळुरूमध्ये महिलेच्या मृतदेहाचे 30 तुकडे फ्रिजमध्ये आढळले