कागल (कोल्हापूर) : डी. आर. माने महाविद्यालयातंर्गत उच्च माध्यमिक व्यवसाय अभ्यासक्रम व महाराष्ट्र व्यवसाय प्रशिक्षण मंडळ (M.B.T.B.) यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित एक दिवसीय उद्योजकता विकास शिबीर दिनांक ०४ मार्च २०२३ रोजी डी. आर. माने महाविद्यालयात संपन्न झाला.
या शिबिरीच्या समारोप प्रसंगी व प्रमाणपत्र वितरण प्रसंगी बोलताना प्रमुख पाहुणे कृष्णात चौगुले, चौगुले डेअरीज, उचगाव यांनी मार्गदर्शन करताना असे सांगितले की, व्यवसाय करताना मेहनत घ्या, व्यवसायात चढ – उतार आले तरी निराश होऊ नका, असा मौलिक सल्ला दिला.
या शिबीरास संस्था संचालक प्रा. बिपीन माने, आयोजक विजयसिंह भोसले यांनी उद्योगशीलतेस प्रवृत्त करुन प्रोत्साहन दिले. या प्रसंगी अध्यक्ष प्रा.जे.टी. सावंत (विभाग प्रमुख) यांनी अध्यक्षीय मनोगत व्यक्त केले. सदर एक दिवसीय शिबिरामध्ये सकाळच्या सत्रात विजयसिंह भोसले व प्रा. विजय जाधव यांची व्याख्याने झाली. दुपारच्या सत्रात नारायण पोवार यांचे व्याख्यान झाले. शेवटी प्रमाणपत्र वितरण समारंभ संपन्न झाला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा.एस्.टी. चौगुले यांनी केले. सूत्रसंचालन डॉ.एस. एस. कातवरे यांनी केले यांनी केले. या कार्यक्रमास विभागाकडील प्रा. एस् . डी . गायकवाड, प्रा.एच् . आर.मोमीन, प्रा . पी . एच् . पाटील, प्रा . टी . एस् . शेख, भगवान कांबळे, सचिन कांबळे यांचे सहकार्य लाभले.
सदर शिबीरास प्राचार्य डॉ.प्रविण चौगले, संस्था सचिव भैय्या माने व संस्था संचालक प्रा. बिपीन माने यांचे मार्गदर्शन लाभले. संपूर्ण शिबिराचे संयोजन प्रा. एस्.टी. चौगुले यांनी केले. कार्यक्रमाचे आभार प्रा. एम् . एम् . चौगुले यांनी मानले.