Friday, November 22, 2024
HomeNewsशाहूनगर येथे महिला दिनानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रम व पोलीस महिला भगिनींचा सन्मान

शाहूनगर येथे महिला दिनानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रम व पोलीस महिला भगिनींचा सन्मान

महिलांनी समाजाला संस्कारित केले आहे.कारण त्या स्वतःच्या आयुष्यात विविध भूमिका बजावत असतात-आमदार अश्विनी जगताप

पिंपरी चिंचवड/क्रांतिकुमार कडुलकर:दि
.२५—‘प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात महिलांचे महत्त्व जाणण्यासाठी दरवर्षी ८ मार्च रोजी आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा केला जातो.या औद्योगिक नगरीत कुटुंबवत्सल स्त्रिया विविध क्षेत्रात बहुमूल्य कामगिरी करत आहेत.

पोलीस दलात काम करणाऱ्या महिला कर्मचारी यांचा सन्मान करताना खूप आनंद होत आहे.इथे महिलांना अतिशय सुंदर व्यासपीठ आधार महिला मंडळाने उपलब्ध करून दिले आहे.त्याचा मला अभिमान आहे.असे आमदार अश्विनी जगताप यांनी पोलीस महिला भगिनींच्या सत्कार करताना म्हटले. आधार महिला मंडळ व कै.कैलासभाऊ चांदगुडे प्रतिष्ठान च्या संस्थापक अध्यक्षा सुप्रियाताई चांदगुडे यांनी राजर्षी शाहू क्रीडांगण शाहूनगर येथे परिसरातील महिलांचा विविध गुणदर्शन सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केला होता.या कार्यक्रमात महिलांनी भक्तिगीते,भावगीते,नृत्य,कविता वाचन सह विविध कला आविष्कार सादर केले.



‘—कुटुंबवत्सल महिलांच्या आयुष्यात प्रचंड कष्ट असतात.संपूर्ण घराचे व्यवस्थापन करताना त्यांना स्वतःसाठी वेळ देता येत नाही.जात्यावरच्या ओवी गाऊन महिलांनी समाजाला संस्कारित केले आहे.त्यांच्या सुप्त कलागुणांना वाव देण्यासाठी सांस्कृतिक कार्यक्रम आयोजन केले आहे.पोलिस महिला भगिनींमूळे या शहरातील सामाजिक सुरक्षा अबाधित राहिली आहे.त्यामुळे या महिलादिनी त्यांचा सन्मान करत आहोत.असे आधार महिला मंडळाच्या अध्यक्षा,भाजपा पिंपरी चिंचवड शहर अध्यक्षा सुप्रियाताई चांदगुडे यांनी सत्कार समारंभाचे वेळी सांगितले

पिंपरी चिंचवड शहर पोलीस दलातील विविध पदावरील एकूण २० महिलांचा स्मृतिचिन्ह देऊन आमदार अश्विनी जगताप यांचे हस्ते सन्मान करण्यात आला.पोलीस कर्मचारी रुपाली सोनावणे,दीपमाला लोहकरे,मीनाक्षी वासनिक,दिपश्री साळुंके,अनिता शेडगे,मीनाक्षी राळे,अर्चना चौधरी,पुष्पा आहेर,लता पारधी,नीलम साबळे,रेखा क्षीरसागर,शीतल मुटके,उषा होले,सुप्रिया कुरंदळे,मालती फलके,अर्चना जाधव,अमृता साखरे,पूजा कुलकर्णी यांना सन्मानीत करण्यात आले.

पिंपरी चिंचवड शहरातील माजी नगरसेविका सुजाता पालांडे,योगिता नागरगोजे,अनुराधा गोरखे,उद्योजिका प्रिती बोंडे,महिला कार्यकर्त्या संगीता तरडे,शर्मिला बाबर,कमल घोलप,दिपाली धानोकर,कविता हिंगे,प्रिया भोंडले,रेणुका भोजने,अरुणा घोळवे,कल्पना पठारे,सौ.दुर्गे,सौ.ढेंबरे,सुप्रिया सोलंकर,प्रभावती चोपडे,नंदा करे,शोभा जगताप यांनी या कार्यक्रमास शुभेच्छा दिल्या.आधार महिला मंडळच्या सदस्या दिपाली करंजकर,अश्विनी तोरखडे,आशा मेटांगे,स्नेहल चांदगुडे,ललित ठेंगे
आणि सर्व सदस्य आणि पदाधिकारी यांनी या कार्यक्रमाचे संयोजन केले.

संबंधित लेख

लोकप्रिय