Sunday, May 19, 2024
Homeपुणे - पिंपरी चिंचवडमन की बात १०१ व्या कार्यक्रमानिमित्त मावळ भाजपचे सांस्कृतिक उपक्रम

मन की बात १०१ व्या कार्यक्रमानिमित्त मावळ भाजपचे सांस्कृतिक उपक्रम

पुणे-मावळ / क्रांतीकुमार कडुलकर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा १०१ वा मन की बात हा कार्यक्रम भाजपा सांकृतिक प्रकोष्ठ महाराष्ट्र प्रदेश वतीने राज्यमंत्री बाळा भेगडे, सांकृतिक प्रकोष्ठ प्रदेश अध्यक्ष प्रिया बेर्डे यांच्या प्रमुख उपस्थिती मधे कान्हे ता.मावळ येथे घेण्यात आला.”मन की बात ” हा कार्यक्रम संपल्यानंतर गौरी वनारसे महाराष्ट्रतील तीन महिला सुप्रसिद्ध संबळ वादका पैकी एक आहे.त्यांनी संबळ वादन केले. यावेळी भारतीय जनता पार्टी सांस्कृतिक प्रकोष्ठमध्ये महाराष्ट्र प्रदेश संघटक वेदांग महाजन यांच्या नेतृत्वाखाली शेकडो कार्यकर्ते व कलाकार यांचा स्लिंग कंपनी कान्हे तालुका मावळ या ठिकाणी प्रवेश करण्यात आला माजी राज्यमंत्री भाजपा प्रदेश उपाध्यक्ष संजय उर्फ बाळा भेगडे व प्रिया बेर्डे यांनी स्वागत केले.


भाजपा सांकृतिक प्रकोष्ठ महाराष्ट्र प्रदेश वतीने प्रदेश संघटकपदी वेदांग महाजन यांची निवड करण्यात आली नियुक्ती पत्रक माजी राज्यमंत्री नवनियुक्त भारतीय जनता पार्टी प्रदेश उपाध्यक्ष संजय उर्फ बाळा भेगडे यांच्या शुभहस्ते देण्यात आले. भाजपा सांस्कृतिक प्रकोष्ठ प्रदेश संघटक वेदांग महाजन यांच्या समाज उपयोगी कार्याचे कौतुक करून बाळा भेगडे यांनी अभिनंदन केले तसेच मावळातील कलाकरांसाठी कला व प्रयोग सादर करण्याकरिता स्वतंत्र नाट्यगृहांची निर्मिती करण्याचे आश्वासन दिले.


या कार्यक्रमाचे आयोजन प्रदेश संघटक वेदांग महाजन यांनी केले दरम्यान मावळ तालुक्यातील कलाकरांसाठी प्रयोग सादरीकरण करण्याकरिता स्वतंत्र नाट्यगृहांची निर्मिती करण्याची मागणी वेदांग महाजन यांनी केली. यावेळी निर्माते अमरदादा गवळी, अभिनेत्री व संपर्क प्रमुख महाराष्ट्र प्रदेश भाजपा सांस्कृतिक प्रकोष्ठ विदया पोकळे-पाटील, प्रदेश उपाध्यक्ष धनंजय वाठारकर, सुप्रसिद्ध अभिनेता, दिग्दर्शक चेतन चावडा, नृत्य दिग्दर्शक भाजपा सांस्कृतिक प्रकोष्ठ पुणे शहर अध्यक्ष जतिन पांडे, भाजपा मावळ तालुका माझी महिला उपाध्यक्षा कल्पना मोरे, विजय पांढरे, कृष्णा दारगुंडे, सचिन गडाख, लक्ष्मन चोरगे, हिरामण कचरे, बबन चोरघे, रमेश चोरघे, दत्ता चोरघे, विद्यार्थी आघाडी अध्यक्ष अभिमन्यू शिंदे, भाजपा नेते राजेंद्र सातकर, बुथ अध्यक्ष संतोष सातकर, कामशेत शहर अध्यक्ष प्रविण शिंदे, आदी मान्यवर उपस्थित होते.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय