मुंबई:-राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत असून आज एकूण ७९७५ रुग्णांची वाढ झाली आहे. तर दिलासादायक बाब म्हणजे बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या देखील वाढत असून आज ३६०६ रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे. आज नव्याने वाढलेल्या ७९७५ रुग्णांमुळे राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा २,७५,६४० इतका झाला आहे. आज २३३ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.आतापर्यंत १,५२,६१३ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत.तर राज्यात सध्या १,११,८०१ इतक्या कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू आह