Thursday, December 5, 2024
Homeआरोग्यकोरोना अपडेट: आज जिल्ह्यात इतक्या रुग्णांची झाली वाढ,वाचा सविस्तर

कोरोना अपडेट: आज जिल्ह्यात इतक्या रुग्णांची झाली वाढ,वाचा सविस्तर



औरंगाबाद:-औरंगाबाद जिल्ह्यात आज एकूण २४८ कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर पडली आहे. या रुग्णांमध्ये मनपा हद्दीतील १८८ तर ग्रामीण भागातील ६० रुग्णांचा समावेश आहे.या वाढलेल्या २४८ रुग्णांमुळे जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या ८४६४ इतकी झाली आहे. आज जिल्ह्यातील २२७ जणांना सुटी देण्यात आली आहे. आजपर्यंत एकूण ५०६१ कोरोनाबाधित रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केल्याने त्यांना सुटी देण्यात आली आहे.तर आतापर्यंत ३५४ रुग्णांचा मृत्यू झाल्यामुळे सध्या एकूण  ३०४९ रूग्णांवर उपचार सुरू आहेत.आज दुपार नंतर ११८ रुग्णांची वाढ झाली. यामध्ये  १०६ रुग्णांची अँटीजेन टेस्टद्वारे केलेली चाचणी पॉझिटिव्ह आली आहे.


तीन कोरोनाबधितांचा मृत्यू


शहरातील तीन विविध खासगी रुग्णालयात तीन कोरोनाबधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. यामध्ये  बीड बायपास रोडवरील अबरार कॉलनीतील ४८ वर्षीय पुरुष, राम नगरातील ७० वर्षीय स्त्री, न्यू श्रेय नगर येथील ७० वर्षीय पुरुष या रुग्णांचा समावेश आहे.

संबंधित लेख

लोकप्रिय