पैठण : शहर व तालुक्यात कोराना बाधितांची संख्या वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर राज्याचे रोहयो व फलोत्पादन मंत्री नामदार संदिपान भुमरे यांनी रविवारी पैठण तहसील कार्यालयात तालुका प्रशासनाची महत्वपूर्ण बैठक घेऊन आतापर्यंत करण्यात आलेल्या व या नंतरच्या कालावधीत करण्यात येणाऱ्या खबरदारीच्या उपाययोजनांचा आढावा घेतला.
३ तास चाललेल्या या बैठकीत नियोजनबद्ध आराखडा तयार करण्याच्या मार्गदर्शक सूचना देताना या कालावधीत हालगर्जीपणा करणाऱ्यांची गय केली जाणार नसल्याचे भुमरे यांनी स्पस्ट केले. यंत्रणांनी समन्वयाने शहरासह ग्रामीण भागातील प्रत्त्येक गावांत २४ तास सतर्क राहावे. गावपातळीवर ग्रामसेवक, तलाठी, पोलिस पाटील, अंगणवाडी सेविका व शिक्षक यांच्या माध्यमातून लक्ष ठेवण्यासाठी पथकं नेमण्याच्या सुचना त्यांनी महसूल व पंचायत समिती विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या. शहरातही याच पद्धतीने नियोजन करून पोलिसांची गस्त आणखी कडक करण्याच्या सूचनाही नामदार भूमरे यांनी यावेळी दिल्या.
यावेळी उपविभागीय अधिकारी स्वप्निल मोरे, तहसीलदार चंद्रकांत शेळके, पोलिस उपअधीक्षक व्ही.व्ही.नेहुल, पोलिस निरीक्षक भगिरथ देशमुख, नगर परिषद मुख्याधिकारी सोमनाथ पाटील जाधव, पंचायत समिती गटविकास अधिकारी भास्करतात्या कुलकर्णी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता राजेंद्र बोरकर, तालुका आरोग्य अधिकारी डॉ विजयकुमार वाघ, ग्रामीण रुग्णालयाचे प्रपाठक ऋषिकेश खाडीलकर, प्रकल्प अधिकारी एस.एम.वणे, शासकीय विद्यालयाचे प्राचार्य के.डी.देवकाते, उप अभियंता एस.राठोड, बूध्दभूषण दाभाडे, तालुका क्रिडा अधिकारी शरद कचरे, भुमी अभिलेख विभागाचे डी.एन.कोलते, सहकार अधिकारी एल.एम.कासार, पाचोड पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक अतूल येरमे, बीडकीनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेंद्र बनसोड, एम.आय.डी.सी च्या सहाय्यक पोलीस निरीक्षक अर्चना पाटील, गटशिक्षणाधिकारी एस.के.केदार, पी.आर.सारडा, शिवप्रसाद खेडकर, नामदार भूमरे यांचे जनसंपर्क अधिकारी नामदेवराव खराद व गणेशराव मडके, तहसील कार्यालयातील जनार्दन दराडे, नारायण वाघ यांच्या सह जवळपास ४५ विविध विभागांचे अधिकारी व बॅंकांचे प्रतिनिधी उपस्थित होते.