Saturday, May 18, 2024
Homeपुणे - पिंपरी चिंचवडधम्मज्योती बुद्धविहार तांदुळवाडी येथे संविधान दिन उत्साहात साजरा

धम्मज्योती बुद्धविहार तांदुळवाडी येथे संविधान दिन उत्साहात साजरा

बारामती/ क्रांतिवीर रत्नदीप : बारामती नगर परिषद बारामती आणि धम्म ज्योती बुद्ध विहार तांदूळवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने संविधान स्तंभ परिसरामध्ये संविधान दिन उत्साहात साजरा झाला. यावेळी नगर परिषदेचे पदाधिकारी तसेच धम्मज्योती ट्रस्टचे ट्रस्टी, ग्रामस्थ, पत्रकार उपस्थित होते.



कार्यक्रमाची सुरुवात संविधान स्तंभाचे पूजन करून झाले. त्यानंतर संवेधानाच्या उद्देशिकाचे सामूहिक वाचन करण्यात आले. धम्मज्योती बुद्ध विहार मधील तथागत गौतम बुद्ध आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांचे पूजन पदाधिकाऱ्यांच्या हस्ते करण्यात आले.



त्यानंतर आपले मनोगत व्यक्त करताना ॲड.योगेश सरोदे म्हणाले, नागरिकांनी लोकशाही जपायचे असेल व समानतेचे अधिकार शाबूत ठेवायचे असतील तर स्वतःच्या मतदानाचा मूल्य हे दुसऱ्या कुणाला न ठरवू देता ते आपण अबाधित ठेवायचा आहे व जितकं मूलभूत अधिकारांप्रती जागरूक असतो तितकच आपल्या मूलभूत कर्तव्य विषयी सुद्धा जागृत राहणं गरजेचं आहे. तरच खऱ्या अर्थाने संविधानाची प्रभावी अंमलबजावणी होऊ शकते.


त्यानंतर बारामती नगर परिषदेच्या स्नेहल घाडगे म्हणाल्या, जगातील सर्वात मोठी लिखित राज्यघटना ही भारताची आहे. स्वातंत्र्य समता आणि बंधुत्व ही तत्वे प्रत्येक भारतीयांनी अंगीकारली पाहिजेत. मसुदा समितीचे अध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते त्यांच्या अविश्रांत परिश्रमामुळेच त्यांना भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार म्हणतात.


त्यानंतर तांदुळवाडी गावचे माजी उपसरपंच भारत सरोदे यांनी संविधान दिनाच्या सर्वांना शुभेच्छा देत उपस्थित सर्वांचे आभार मानले. संविधान परिसरामध्ये विद्युत रोषणाई तसेच फुलांची सजावट करण्यात आली होती. या कार्यक्रमास प्रामुख्याने बारामती नगर परिषदेच्या पदाधिकारी स्नेहल घाडगे मॅडम, संजय चव्हाण, महेश आगवणे, दीपक पंजाबी, जमाल शेख, भारत गदई, ॲड.योगेश सरोदे , नगरसेविका ज्योती सरोदे, नगरसेवक समीर चव्हाण , माजी उपसरपंच भारत सरोदे, भीमराव सरोदे , आदित्य धेंडे, मंगेश धेंडे, रत्नदीप सरोदे, हनुमंत सरोदे, रमेश पवार तसेच ग्रामस्थ उपस्थित होते.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय