Friday, November 22, 2024
HomeNewsबारामती लोणंद रेल्वे मार्गासाठी होणार ४० हेक्टर सक्तीचे भूसंपादन

बारामती लोणंद रेल्वे मार्गासाठी होणार ४० हेक्टर सक्तीचे भूसंपादन

पुणे : बारामती- फलटण – लोणंद या नवीन एकेरी रेल्वे मार्गासाठी आवश्यक असलेल्या १७६ हेक्टर जमिनीपैकी काही जमिनीचे भूसंपादन करण्यात आले आहे परंतु अद्याप पर्यंत 40 हेक्टर जमिनीचे भूसंपादन झाले नसून ते भूसंपादन सक्तीने करण्याचा प्रस्ताव रेल्वे प्रशासनाकडे दिल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून समोर आले आहे.

आतापर्यंत या रेल्वे मार्गासाठी लागणाऱ्या 176 हेक्टर जमिनीपैकी 131 हेक्टर जमिनीचे भूसंपादन पूर्ण करण्यात आले आहे. जर आपण या रेल्वे प्रकल्पाचा विचार केला तर पुणे आणि सातारा या दोन जिल्ह्यांना जोडणारा हा महत्त्वपूर्ण रेल्वे प्रकल्प असून या रेल्वे मार्गाची लांबी 63.65 कीमी असून यासाठी लागणारी जमिनीचे भूसंपादन हे फलटण व बारामती या तालुक्यांमधून करण्यात येत आहे.

या एकूण अंतरापैकी 37 किलोमीटर पेक्षा जास्त रेल्वे मार्ग हा बारामती तालुक्यातून जातो. परंतु बारामती तालुक्यातील काही गावांमधील खाजगी जागा संपादित करण्याची प्रक्रिया या माध्यमातून करण्यात आली आहे. या रेल्वे मार्गासाठी 176 हेक्टर एवढी जागा संपादित करणे आवश्यक असून त्यापैकी 121 हेक्टर जमीन संपादित करण्यात आली असून येणाऱ्या काही दिवसात 9.68 हेक्टर क्षेत्र खरेदी करण्यात येणार आहे.


परंतु लागणारे 40 हेक्टर क्षेत्र संपादन करण्यासाठी त्या ठिकाणाच्या नागरिकांकडून विरोध होत असून ती जमीन आता सक्तीने संपादन करावी लागणार आहे व त्यासाठी बारामतीच्या प्रांताधिकार्‍यांनी रेल्वे प्रशासनाला सक्तीने भूसंपादन करावे अशा पद्धतीचा प्रस्ताव दिला आहे व त्यासाठी त्यांची भूसंपादन अधिकारी म्हणून नियुक्ती देखील करण्यात आले आहे.

त्यामध्ये तालुक्यातील साडेसात हेक्‍टर जमीन ही वनविभागाची आहे. त्यासंबंधीचा प्रस्ताव वन विभागाकडे पाठवण्यात आला होता व त्याला वनविभागाकडून मान्यता देखील देण्यात आली आहे.

Lic

Lic
संबंधित लेख

लोकप्रिय