Friday, November 22, 2024
Homeताज्या बातम्याCommunist Party : भारतीय कम्युनिस्ट पक्ष 'ही' विधानसभेची जागा लढवणार

Communist Party : भारतीय कम्युनिस्ट पक्ष ‘ही’ विधानसभेची जागा लढवणार

नाशिक : नाशिक जिल्हा कौन्सिलची बैठक आयटक कामगार केंद्र, भारतीय कम्युनिस्ट पक्ष कार्यालय, नाशिक येथे राज्य सचिव काॅम्रेड सुभाष लांडे, राज्य कौन्सिल सदस्य काॅम्रेड अभय टाकसाळ यांच्या उपस्थितीत व राज्य सह सचिव काॅम्रेड राजू देसले यांच्या अध्यक्षतेखाली झाली. (communist Party)

बैठकीची सुरूवात लातूर येथील भाकप पक्ष नेते काॅम्रेड राजू पाटील तसेच वायनाड भूस्खलनात बळी पडलेल्या मृतांना श्रध्दांजली अर्पण करून करण्यात आली. प्रास्ताविक जिल्हा सचिव काॅम्रेड महादेव खुडे यांनी केले.

यानंतर राज्य सचिव काॅम्रेड सुभाष लांडे यांनी नॅशनल कौन्सिलचे निर्णय व त्यानुसार राज्य कौन्सिलची नाशिक येथे २४/२५ ऑगस्टला झालेल्या बैठकीची माहिती दिली. इंडिया आघाडीच्या जास्तीत जास्त जागा निवडून आणण्यासाठी पक्षाने महत्त्वाची भागीदारी केली. त्याचवेळी इंडिया आघाडीने व्यवस्थित सीट शेअरिंग केले असते तर इंडिया आघाडीच्या आणखी जागा वाढल्या असत्या.असे असले तरी अल्पमतातले भाजपा सरकार मूळ गुण दाखवणार. अशा वेळी आणखी आक्रमकपणे एकजुटीने जनतेचे प्रश्न मांडावेत असे आवाहन त्यांनी केले.

पक्षाच्या वतीने महाराष्ट्रात निवडक विधानसभांच्या जागांचा प्रस्ताव ‘मविआ’ आघाडीला देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. जिल्ह्यातील जातीनिहाय जनगणना परिषद 16 व 30 ऑगस्ट चे आंदोलन यशस्वी करण्याची सूचना केली. राज्यव्यापी जातीनिहाय जनगणना परिषद कोल्हापूरला होत असून त्याचे उद्घाटक खासदार शाहू महाराज असतील व मविआ नेत्यांना सदर बैठकीचे निमंत्रण दिले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.

काॅम्रेड अभय टाकसाळ यांनी स्मार्ट मीटर आंदोलनाबाबत माहिती दिली व अशाप्रकारे आंदोलन नाशिक जिल्ह्यातही करण्यात यावे असे आवाहन केले. विशाळगड येथे हिंदूत्ववाद्यांनी मुस्लिम वस्तीवर केलेल्या हल्ल्याची प्रत्यक्ष भेटून माहिती घेतलेली वस्तुस्थिती सांगितली.

काॅम्रेड राजू देसले यांनी अध्यक्षीय समारोप करताना राज्य कौन्सिल मध्ये झालेल्या निर्णयांची माहिती दिली व नाशिक जिल्ह्याने याबद्दल केलेल्या कृतींची माहिती दिली. यावेळी काॅम्रेड देसले यांनी जिल्हा कौन्सिल सदस्य प्राजक्ता कापडणे, मीना आढाव, नामदेव बोराडे यांनी आयटक, पेन्शनर्स फेडरेशनसाठी केलेल्या कामाबद्दल अभिनंदन केले. राज्य कौन्सल बैठकीस मदत केली त्याबद्दल नाशिक जिल्हा कौन्सिल चे काॅम्रेड सुभाष लांडे यांनी अभिनंदन केले. यावेळी नाशिक येथील विराज देवांग यांची एआयएसएफ राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल त्यांचा सुभाष लांडे यांच्या हस्ते सत्कार झाला. त्याचप्रमाणे इफ्टा च्या ‘प्रथम पुरुष’ या नाटकाचा समावेश हैद्राबाद येथील नाट्य महोत्सवात झाल्याबद्दल त्यांचाही सत्कार करण्यात आला. (communist Party)

यावेळी नाशिक येथे होणाऱ्या बांधकाम कामगारांच्या राज्य अधिवेशनाचे रिपोर्टींग काॅम्रेड भीमा पाटील यांनी केले. सदर अधिवेशनासाठी १५ जिल्ह्यांतून १५० प्रतिनिधी उपस्थित राहणार असल्याचे त्यांनी सांगितले. सदर भव्य रॅली नंतर अधिवेशनाचे उद्घाटन काॅम्रेड शाम काळे, राजू देसले यांच्या उपस्थितीत १० तारखेला होईल.

किसान सभेचे काम वाढविण्यासंदर्भात लवकरच बैठक घेण्याचे भास्कर शिंदे यांनी सांगितले. सप्टेंबरमध्ये शेतमजूर युनियनचे अधिवेशन व कार्यकारिणी तयार करण्यात येणार असल्याचे भीमा पाटील यांनी सांगितले. तसेच दलित अधिकार आंदोलन जिल्हा शिबीर आयोजित करण्यात येणार असल्याचे मनोहर पगारे यांनी सांगितले. (communist Party)

बैठकीत झालेले निर्णय :
१) पक्ष सभासद मोहीम पुढील वर्षी दुप्पट करण्याचा निर्धार केला.
२) पक्ष शताब्दी वर्षात जिल्ह्यातील जून्या काॅम्रेडसची चरित्रे लिहिण्याबद्दल काॅम्रेड रामदास भोंग यांचेवर जबाबदारी देण्यात आली. साधारण २०० पाने होतील असे त्यांनी सांगितले.
३) नाशिक पूर्व मतदार संघातून काॅम्रेड राजू देसले यांनी निवडणूक लढवावी, असा ठराव जिल्हा कौन्सिल ने केला, त्यांच्या तयारीबाबत माहिती व सूचना देण्यात आल्या.
४) जातीनिहाय जनगणना परिषद नाशिक येथे १६ ऑगस्टला घेण्यात येणार असून त्याला अभ्यासक, कार्यकर्ते काॅम्रेड किशोर मांदळे उपस्थित राहतील. याबातच्या तयारीबद्दल चर्चा झाली.
५) ३० ऑगस्टला नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयापुढे निदर्शने/ मोर्चा करण्यात येईल.
६) इतर आयत्या वेळच्या विषयांमध्ये केरळ भूस्खलनामध्ये मयत झालेल्यांच्या परिवारासाठी मदतनिधी काढण्याबद्दल ठरविण्यात आले.

यावेळी काॅम्रेड सुभाष लांडे, राजू देसले, अभय टाकसाळ, महादेव खुडे,भास्करराव शिंदे, दत्तू तुपे, विराज देवांग, तल्हार शेख, मनोहर पगारे, पद्माकर इंगळे, जैनूल अववद्दीन, नामदेवराव बोराडे, रामचंद्र टिळे, कैलास मोरे, प्राजक्ता कापडणे, प्रविण केदारे, रंगनाथ जिरे, सुकदेव केदारे, भीमा पाटील, एस. आर.खतीब इ.उपस्थित होते.

whatsapp link
google news gif

हेही वाचा :

‘मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजने’द्वारे ज्येष्ठ नागरिकांची तीर्थक्षेत्र भेटीची इच्छा शासन पूर्ण करणार

सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका अंतर्गत भरती

मोठी बातमी : भारताला मोठा धक्का ; ऑलिम्पिकमध्ये विनेश फोगाट अंतिम फेरीतून अपात्र

साप पकडताना सर्पमित्राला सापाचा दंश, सर्पमित्राचा दुर्दैवी मृत्यू

BSNL लवकरच 5G आणणार, पहिला 5G व्हिडीओ कॉल यशस्वीरित्या

बांगलादेशातील दंगलीत २५ लोकांना जिवंत जाळले, फाईव्ह स्टार हॉटेल पेटवले

संबंधित लेख

लोकप्रिय