बीड : जिल्ह्यातील मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे नेते कॉम्रेड बाबासाहेब सरवदे यांचे आज सायंकाळी साडेसात वाजता दुःखद निधन झाले.
कॉ. बाबासाहेब सरवदे हे अखिल भारतीय शेतमजूर युनियन चे वर्किंग कमिटी मेंबर व मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे माजी राज्य कमिटी सदस्य होते. बीड जिल्ह्यातील महाराष्ट्र शिक्षण संस्थेचे ते अध्यक्ष होते. मागील एक वर्षापासून ते कर्करोगाशी झुंज देत होते. त्यांच्या निधनामुळे राज्यातील शेतमजूर चळवळीचे व डाव्या चळवळीचे अत्यंत नुकसान झाले आहे. त्यांच्या पश्चात त्यांच्या परिवारामध्ये पत्नी कॉम्रेड सरोज सरवदे, मुलगा अजिंक्य व मुलगी मोनिका असा परिवार आहे.