Sunday, May 19, 2024
HomeNewsउपप्राचार्या डॉ.वनिता कुऱ्हाडे यांना "राणी लक्ष्मीबाई पुरस्कार"

उपप्राचार्या डॉ.वनिता कुऱ्हाडे यांना “राणी लक्ष्मीबाई पुरस्कार”

पिंपरी चिंचवड/क्रांतिकुमार कडुलकर
कमला शिक्षण संस्थेतील प्रतिभा कनिष्ठ महाविद्यालयाच्या उपप्रचार्या डॉ.वनिता कुऱ्हाडे यांना अभिमानास्पद असा” राणी लक्ष्मीबाई पुरस्कार” मिळाला. त्याबद्दल संस्थेकडून आणि शिक्षक व शिक्षकेत्तर वृंद यांच्याकडून हार्दिक अभिनंदन करण्यात आले.

आपला आवाज न्यूज नेटवर्क आयोजित आचार्य अत्रे सभागृहामध्ये झालेल्या सोहळ्यामध्ये खासदार श्रीरंग बारणे, खासदार डॉ.अमोल कोल्हे तसेच अनेक विशेष मान्यवर उपस्थित होते.डॉ.वनिता कुऱ्हाडे यांची जिद्द,धाडस,व उल्लेखनीय कार्ये यांचा विचार करून त्यांना “राणी लक्ष्मीबाई पुरस्कार” देऊन सन्मानित करण्यात आले.

संस्थेचे सचिव डॉ दीपक शहा यांनी डॉ वनिता कुऱ्हाडे यांचे कौतुक करून अभिनंदन केले आहे. तसेच प्राचार्य डॉ बाबासाहेब सांगळे व सर्व शिक्षक वृंद यांनी ही त्यांचे अभिनंदन केले आहे.

Lic

Lic

LIC
संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय