Monday, May 13, 2024
Homeक्राईमयोगींच्या UP मध्ये चाललाय काय? विवाहित पुरुषावर 3 जणांनी सामूहिक बलात्कार करून...

योगींच्या UP मध्ये चाललाय काय? विवाहित पुरुषावर 3 जणांनी सामूहिक बलात्कार करून व्हिडिओ केला व्हायरल

उत्तर प्रदेशमधून एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. त्यानंतर मुलीच काय तर मुलंही सुरक्षित नाहीत, असंच म्हणायची वेळ आली आहे. संभलमध्ये एका विवाहित तरुणावर सामूहिक बलात्कार झाला आहे.गावातल्या तीन तरुणांनीच हे कृत्य केलं. नराधम इतक्यावरच थांबले नाहीत, तर त्यांनी या घटनेचा व्हिडिओ बनवला आणि सोशल मीडियावर व्हायरल केला आहे. या प्रकरणी कुटुंबीयांच्या तक्रारीनंतर तीन आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यापैकी एका आरोपीला अटक करण्यात आली असून, दोघांचा शोध सुरू आहे.

सामूहिक बलात्काराचा व्हिडिओ केला व्हायरल

हे प्रकरण संभलच्या रजपुरा पोलीस स्टेशन परिसरात घडलं आहे. 24 वर्षीय तरुण शेतात पहारा देण्यासाठी गेला होता. दरम्यान, त्याच गावातल्या तीन मुलांनी त्याला पकडून शेतात नेलं. शेतात नेल्यानंतर तिघांनीही तरुणावर सामूहिक बलात्कार केला. आरोपींनी या संपूर्ण घटनेचा व्हिडिओही बनवला आणि नंतर तो सोशल मीडियावर व्हायरल केला.

रजपुरा पोलीस स्टेशन परिसरातल्या गावातल्या एका महिलेने आपल्या मुलावर सामूहिक बलात्कार झाल्याप्रकरणी तीन आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी आरोपीविरुद्ध भादंवि कलम 377/506/67ए अन्वये गुन्हा दाखल केला आहे. एका आरोपीला अटक करण्यात आली आहे आणि इतर दोघे फरार आहेत. त्यांचा शोध सुरू आहे, अशी माहिती गुन्नौरचे सीओ आलोक कुमार सिद्धू यांनी दिली.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय