Monday, May 20, 2024
Homeग्रामीणराज्यातील जिम/व्यायामशाळा सुरू करण्याची सीटूची मुख्यमंत्री पालकमंत्र्यांकडे मागणी

राज्यातील जिम/व्यायामशाळा सुरू करण्याची सीटूची मुख्यमंत्री पालकमंत्र्यांकडे मागणी

नाशिक (प्रतिनिधी) :-  २२ मार्च २०२० पासून लॉक-डाउनच्या निर्णयामुळे राज्यातील जिम/व्यायाम शाळा बंद आहेत. एप्रिल नंतर टप्प्याटप्प्याने शिथीलता देऊन काही उद्योग, व्यवसाय सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे. जिम व व्यायाम शाळानांही सुरू करण्याची परवानगी द्यावी, अशी सीटूच्या वतीने मुख्यमंत्री व पालकमंत्री यांच्याकडे मागणी करण्यात आली आहे.

             राज्यात जिमची संख्या व त्यावर अवलंबून असणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्या फार मोठी आहे. गेले ३ महिने व्यवसाय बंद असल्यामुळे जिम व्यवसायिक व त्यांचे कर्मचारी यांचे उत्पन्न बुडाल्याने अतोनात हाल होत आहेत. आता लॉक डाऊन मध्ये शिथिलता येत असल्याने जिम व व्यायाम शाळा व्यवसालाही अटी शर्ती टाकून व्यवसाय सुरू करण्यास परवानगी देण्यात यावी अशी मागणी सिटूचे राष्ट्रीय उपाध्यक्ष व राज्याध्यक्ष डॉ.डी.एल.कराड व राज्य सरचिटणीस एम.एच.शेख.यांनी केली  आहे.

            जीम व्यवसायिकांनी या संबंधातील सर्व अटी-शर्तीचे पालन करण्याचे  लेखी स्वरुपात मान्य केले आहे. त्यामुळे त्यांना परवानगी देण्याबाबत विचार करावा असे सीटूने म्हटले आहे.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय