Sunday, May 19, 2024
Homeराजकारणकेंंद्र सरकारच्या कामगारविरोधी धोरणाच्या विरोधात संप; आमदार विनोद निकोले यांच्या नेतृत्वात सिटूचे...

केंंद्र सरकारच्या कामगारविरोधी धोरणाच्या विरोधात संप; आमदार विनोद निकोले यांच्या नेतृत्वात सिटूचे अदानी कंपनीच्या गेटवर निदर्शने.

प्रतिनिधी : डहाणू शहरात आणि अदानी कंपनीच्या गेटवर मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे आमदार विनोद निकोले यांच्या नेतृत्वाखाली आज ३ जुलै रोजी सीटूने जोरदार निदर्शने केली.

केंंद्र सरकारच्या कामगारविरोधी धोरणाच्या विरोधात कामगार संघटनांनी देशव्यापी संप पुकारला आहे. कामगार कायद्यातील बदल रद्द करा, कामगारांना लॉकडाऊन काळात वेतन द्या आदीसह मागण्या या आंदोलनात करण्यात आल्या.

डहाणू रेल्वे स्टेशनच्या गजबजलेल्या परिसरात आणि सीटूची युनियन असलेल्या अदानी (पूर्वी रिलायन्स) या मोठ्या कंपनीच्या गेटवर शेकडो कामगारांनी जोरदार निदर्शने केली. निदर्शनांत आणि सभेत भाजपच्या मोदी सरकारच्या कामगार-शेतकरीविरोधी धोरणांवर घणाघाती टीका करण्यात आली आणि कामगार व श्रमिक जनतेच्या ज्वलंत मागण्या लावून धरण्याचा निर्धार यावेळी करण्यात आला.

यावेळी माकपचे चंद्रकांत घोरखाना, सुनील दवणे, रियाझ मिर्झा, सुरेश जाधव, हरिश्चंद्र गहला, रमेश गांगड, सुरेश मोरे आदीसह कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते.


संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय