पिंपरी चिंचवड : ताण आणि तणाव निर्माण होण्याची कारणे प्रत्येकासाठी वेगवेगळी असतात. व्यवसाय, नोकरी, शिक्षण इ सर्व क्षेत्रात कार्यरत असलेल्या व्यक्तीच्या दैनंदिन जीवनातील समस्या सोडवताना किंवा विविध सवरूपाच्या जबाबदाऱ्या पार पाडत असताना ताण तणाव याना सामोरे जावे लागते.
‘एक ना धड भाराभार चिंध्या’ या उक्तीप्रमाणे अनेक व्यक्ती एका वेळी अनेक कार्यात स्वत:ला गुंतवून घेतात व त्यामुळे एकही काम व्यवस्थित करू शकत नाहीत व सर्व कामांचा ताण घेऊन दुसर्यालाही ताण देतात.आणि निराश होत असतात. त्यामुळे आपल्या क्षमतेनुसार व उक्तीनुसार कार्यक्षेत्राची निवड करून सहन करता येईल तेवढाच ताण घ्यावा म्हणजे निवडलेले काम सुव्यवस्थित पार पडेल.
अशा वेळी परिस्थिती जरी प्रतिकूल असली तरी त्याला सकारात्मक प्रतिसाद देण्याची क्षमता आपल्या मनामध्ये निर्माण केली पाहिजे,असे औद्योगिक स्ंबंधआणि मानसशात्र अभ्यासक समुपदेशक श्रीमती स्मिता जाधव यांनी लायन्स क्लब ऑफ राहटणी,अभिसार फाउंडेशन पुणे आदर्श कॉलनी वाकड पोलिस स्टेशन समोर दत्त मंदिर रोड वाकड पुणे
आणि ऊर्जा डेव्हलपमेंट अकॅडमी च्या संयुक्त विद्यमाने वाकड येथील “मनाची सुप्त शक्ती’ या विषयावरील विद्यार्थी आणि नोकरदार युवक युवतीच्या कार्यशाळेत सांगितले.
त्या पुढे म्हणाल्या की, आपले अंतर्मन आपल्याला वारंवार विविध प्रकारचे संदेश देत असते. आपल्या चुकीच्या श्रद्धा, संकल्पना, बाहेरून लादले गेलेले नकारात्मक विचार आचार यामुळे काही निर्णय चुकतात. कोणताही निर्णय अंतर्मनाला जागृत ठेवून घेतला तर ताणतणाव का निर्माण होत आहेत. हे समजून येईल. तणावाचे व्यवस्थापन केले तर अपेक्षित यश मिळते, सर्वच तणाव निरुपयोगी नसतात. घरगुती, व्यवसायिक, आर्थिक, नोकरीच्या क्षेत्रात आप्तस्वकीय, वरिष्ठ यांच्याशी मानवी संबंध सृजनशील ठेवण्यासाठी ह्रदयाची शांतता प्रार्थनेतून आणि सकारात्मक विचारातून मिळते.
या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी विनीता पाटील होत्या. प्रास्ताविक अशोक जाधव यांनी केले. सूत्रसंचालन कल्पना मोहिते यांनी केले. संयोजन दिलीप कलाटे,धनंजय बालवाडकर, भोंडे, अग्रवाल यांनी केले.