Friday, November 22, 2024
Homeआंतरराष्ट्रीयचीनमुळे जगाला टेन्शन; अवकाशात पाठवलेल्या रॉकेटवरील नियंत्रण सुटले

चीनमुळे जगाला टेन्शन; अवकाशात पाठवलेल्या रॉकेटवरील नियंत्रण सुटले


बीजिंग:
चीनमुळे पुन्हा एकदा जगापुढे नवीन समस्या उभी राहिली आहे. चीनने काही दिवसांपूर्वी लाँग मार्च ५ बी रॉकेट अवकाशात पाठवले होते. मात्र, या रॉकेटवरील चीनचे नियंत्रण सुटले असल्याची माहिती समोर आली आहे. येत्या काही दिवसात हे रॉकेट पृथ्वीवर आदळणार आहे. मात्र, रॉकेटवर नियंत्रण नसल्यामुळे नेमक्या कोणत्या ठिकाणी हे रॉकेट कोसळेल याबाबत काहीही स्पष्टता नाही.

लाँग मार्च ५ बी रॉकेट :

अमेरिकेच्या अंतराळ स्थानक केंद्राला आव्हान देण्याचा प्रयत्न चीनकडून सुरू झाला आहे. चीनच्या अंतराळ संशोधन संस्थेने काही दिवसांपूर्वीच हे २१ टन वजनाचे ‘लाँग मार्च ५ बी’ श्रेणीतील रॉकेट लाँच केले होते. अंतराळात चीनकडून अंतराळ स्थानक केंद्र उभारले जात आहे. नियोजनानुसार हे रॉकेट समु्द्रात कोसळणार होते. मात्र, त्याआधीच नियंत्रण गमावल्याने चिंता वाढली आहे. एका अंदाजानुसार हे नियंत्रण गमावलेले रॉकेट न्यूयॉर्क, मद्रिद बीजिंग आणि दक्षिण चिली, वेलिंग्टन आदी भागात कोसळू शकते.

कधी होणार अंतराळ स्थानक?

चिनी अंतराळ संशोधकांच्या दाव्यानुसार, चीनचे अंतराळ स्थानक सात वर्षानंतर कार्यान्वित होईल. साधारणपणे १५ वर्षे हे अंतराळ स्थनक टिकू शकते. मल्टीमॉडल स्पेस स्टेशनच्या मुख्यत: तीन भागांमध्ये असणार. यामध्ये एक अंतराळ कॅप्सूल आणि दोन प्रयोगशाळा असणार आहेत. याचे एकूण वजन ४० मेट्रिक टनच्या सुमारास असेल.

संबंधित लेख

लोकप्रिय