Friday, November 22, 2024
Homeराजकारणराज्यातील रिक्त पदांच्या भरती संदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची महत्वाची घोषणा

राज्यातील रिक्त पदांच्या भरती संदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची महत्वाची घोषणा

मुंबई, दि. 25 : भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त राज्यातील ७५ हजार रिक्त पदांची भरती केली जाईल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत सांगितले.

महाराष्ट्र विधानसभा नियम २९२ अन्वये उपस्थित करण्यात आलेल्या अंतिम आठवडा प्रस्तावावरील चर्चेला उत्तर देताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलत होते.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, राज्यातील विविध विभागांच्या आस्थापनेवरील रिक्त पदांचा आढावा घेतला जात आहे. या सर्व रिक्त जागा भरण्यासाठी ७५ हजार रिक्त पदांची भरती केली जाणार आहे. या पदसंख्येत आणखी काही हजारांत वाढ होण्याची शक्यता आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भाषणातील मुद्दे

पेट्रोल-डिझेलच्या दरात कपात केली

चौदा लाख शेतकऱ्यांना आर्थिक मदत

उपसा जलसिंचन योजनेच्या वीजदरात एक रुपयांने कपात

राज्यात गुंतवणूक करण्यासाठी आवश्यक प्रयत्न

हिंदूह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाचे लवकरच लोकार्पण

सत्तावीस हजार कोटी रुपयांचे विकास प्रकल्प हाती

‘एमएमआरडीए’च्या साठ हजार कोटी रुपयांच्या प्रकल्पांना शासन हमी

मुंबई-गोवा महामार्गाचा सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्यास सुरुवात

प्रत्येक जिल्ह्यात वैद्यकीय महाविद्यालय सुरू करणार

वसई विरार मल्टीमोडल हबचा सविस्तर प्रकल्प अहवाल

पुणे रिंग रोड आणि रेवस-रेड्डी रस्त्यास निधी उपलब्ध करणार

पंढरपूरच्या विठ्ठल रुक्मिणी मंदिराचा सर्वंकष विकास आराखडा

मंदिरे आणि गड किल्ले यांचे जतन-संवर्धन करणार

कोल्हापूर सांगली शहरातील पुराबाबत सल्ला घेऊन उपाययोजना करणार

संबंधित लेख

लोकप्रिय