Friday, November 22, 2024
Homeताज्या बातम्याChhindwara : कुऱ्हाडीने आई-वडील, पत्नीसह ८ जणांची हत्या करून आत्महत्या

Chhindwara : कुऱ्हाडीने आई-वडील, पत्नीसह ८ जणांची हत्या करून आत्महत्या

Chhindwara : मध्य प्रदेशातील छिंदवाडा जिल्ह्यात एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. जिल्ह्यातील माहुलझीर पोलीस ठाण्यांतर्गत असलेल्या बोदलकचार गावात एका युवकाने आई-वडील, पत्नी आणि भावासह कुटुंबातील ८ जणांची कुऱ्हाडीने वार करून हत्या केली आहे. यानंतर त्याने स्वतः गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. छिंदवाडा (Chhindwara) येथील या घटनेने संपूर्ण मध्य प्रदेश हादरले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मध्य प्रदेशातील छिंदवाडा जिल्ह्यात एका व्यक्तीने कुऱ्हाडीने वार करून आपल्याच कुटुंबातील ८ जणांचा जीव घेतला. दिनेश असे आरोपीचे नाव आहे. त्याचं वय हे (27) आहे. त्यांच्या पश्चात आई सियाबाई (वय ५५ वर्षे), भाऊ श्रावण (वय ३५ वर्षे), वहिनी बारतो बाई (वय ३० वर्षे), भाची शेवंती (वय ४ वर्षे), भाची दीपा (वय १.५ वर्षे), असा परिवार आहे. बहीण पार्वती (वय १६ वर्षे), भाचा कृष्णा (वय ५ वर्षे) आणि पत्नी वर्षा (वय २३ वर्षे) यांच्या डोक्यावर व मानेवर कुऱ्हाडीने वार करून त्यांची हत्या करण्यात आली.

हा गुन्हा केल्यानंतर आरोपीने गळफास लावून घेतला. ही घटना मंगळवारी रात्री २-३ वाजण्याच्या सुमारास घडल्याचे सांगण्यात येत आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. स्थानिक पोलिसांनी संपूर्ण गाव सील करून तपास सुरू केला आहे.

Chhindwara

मात्र, आरोपी दिनेशचे मानसिकदृष्ट्या अस्वस्थ होता. वर्षभरापासून आरोपीची मानसिक स्थिती चांगली नव्हती अशी माहिती समोर आली आहे. उपचारानंतर तो सामान्य आयुष्य जगत होता. मागच्या आठवड्यात 21 मे रोजी त्याचा विवाह झाला होता. लग्नानंतर त्याला पुन्हा एकदा मानसिक त्रास झाला.

पोलिसांचे म्हणणे आहे की, आरोपीचे २१ मे रोजी लग्न झाले होते आणि त्याने आधी पत्नीची हत्या केली. पत्नीची हत्या केल्यानंतर आरोपीने आईची हत्या केली. पोलिसांनी घटनास्थळावरून एक कुऱ्हाडही जप्त केली आहे. या सामूहिक हत्येमागील कारणे सध्या समजू शकलेली नाहीत.

whatsapp link
google news gif

हेही वाचा :

पुणे अपघात प्रकरण : बिर्याणीचा आस्वाद घेत समितीकडून चौकशी, संताप व्यक्त

अन् राहुल गांधी यांनी अचानक ओतले डोक्यावर पाणी, व्हिडिओ व्हायरल

जितेंद्र आव्हाड आज महाड येथे करणार मनुस्मृतीचे दहन, वाचा काय आहे प्रकरण !

ब्रेकिंग : पालघरमध्ये रेल्वेचा भीषण अपघात ; डझनभर गाड्या रद्द, रेल्वेकडून हेल्पलाइन क्रमांक जारी

मोठी बातमी : बाबा गुरमीत राम रहीमची हत्याकांड प्रकरणातून निर्दोष मुक्तता

ब्रेकिंग : अजित पवार यांना मोठा धक्का, ‘या’ प्रकरणात होणार चौकशी

लोकसभेच्या निकाला अगोदरच राज ठाकरेंनी भाजपाला दिला मोठा धक्का

मोठी बातमी : ICICI आणि YES बँकेवर भारतीय रिझर्व्ह बँकेची मोठी कारवाई

माझ्या भुकेल्या पोटासाठी मी नोकरीच्या शोधात, उर्फी जावेदची पोस्ट व्हायरल !

ब्रेकिंग : लोकसभेत काय होईल ब्रम्हदेवही सांगू शकत नाही अजित पवार यांचे मोठे विधान

NDA : एनडीए प्रवेशासाठी सीईटी; अर्ज करण्यासाठी काहीच दिवस बाकी!

छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्रात प्रवेशासाठी मुलाखतीस हजर राहण्याचे आवाहन

युनिट मुख्यालयाच्या कोट्यासाठी अग्निवीर भरती मेळाव्याचे आयोजन

संबंधित लेख

लोकप्रिय