Monday, May 20, 2024
HomeNewsPCMC:'अभिसार फाउंडेशन'च्या दिव्यांग शाळेच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरी

PCMC:’अभिसार फाउंडेशन’च्या दिव्यांग शाळेच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरी

पिंपरी चिंचवड/क्रांतिकुमार कडुलकर:दि.१९- वाकड येथील “अभिसार फाउंडेशनच्या “ऊर्जा “दिव्यांग मुलांची शाळा व कार्यशाळा येथे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी ” छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस सचिव रमेश मुसूडगे व मुख्य कार्यकारी अधिकारी किन्नरी शाह,शामल चवरी यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

यावेळी “शिवस्वराज कला, संस्कृती संवर्धन मंच” कोथरूड येथील अंध मुलींनी छत्रपती शिवाजी महाराजांचा पोवाडा,जय जय महाराष्ट्र माझा,दैवत छत्रपती,ज्ञानातून उसळे तलवारीची पात,अशी विविध गीते सादर करून छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन केले.

शामल चबरी, श्रध्दा शिंदे,अंकिता कसबे,अमृता खेत्रे,जना मोरे, कीर्ती शेलार या अंध मुलींनी गाणी सादर केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वैशाली खेडेकर यांनी केले.तर स्मिता हांडे यांनी आभार मानले. भाग्यश्री कापसे, विकास जगताप, ऋषिकेश मुसूडगे,केशव पारखी,योगेश आढले यांनी कार्यक्रमाचे संयोजन केले.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय