Wednesday, January 15, 2025
Homeराज्यचंद्रकांत पाटीलांनी सांगितले भाजपच्या विजयाचे गुपित, म्हणाले मविआची मतं फुटली नसून...

चंद्रकांत पाटीलांनी सांगितले भाजपच्या विजयाचे गुपित, म्हणाले मविआची मतं फुटली नसून…

मुंबई : राज्यसभेच्या सहा जागांसाठी शुक्रवारी मतदान झाले. या सहा जागांसाठी एकूण सात उमेदवार उभे होते. त्यामध्ये महाविकास आघाडीचे चार तर भाजपचे तीन उमेदवार होते. राज्यसभेच्या या निवडणूकींचा निकाल रात्री उशीरा लागला.

राज्यसभेच्या या निवडणुकीत महाविकास आघाडीच्या राष्ट्रवादीचे प्रफुल्ल पटेल, काँग्रेसचे इम्रान प्रतापगढी, शिवसेनेचे संजय राऊत हे तीन उमेदवार निवडून आले असून शिवसेनेचे संजय पवार यांचा मात्र पराभव झाला. तर भाजपच्या पियुष गोयल, अनिल बोंडे आणि धनंजय महाडिक या तीनही उमेदवारांनी विजय मिळवला. या विजयाचा भाजपकडून जल्लोष व्यक्त करण्यात येत आहे. तर महाविकास आघाडीची काही मते फुटली असल्याची चर्चा सुरू आहे. यावर आता भाजप प्रदेशाध्याक्ष चंद्रकांत पाटील यांनी एक ट्वीट करत विजयाचे कारण सांगितले आहे.

देशसेवेसाठी काम करायचे आहे ? आसाम रायफल्स मध्ये 1380 पदांसाठी भरती, आजच अर्ज करा

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी ट्वीट करत आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. त्यांनी ट्वीट मध्ये म्हटले आहे की, मविआची मतं फुटली नाहीत, भाजपा अधिक विश्वासार्ह पर्याय वाटल्यानं ती आम्हाला मिळाली आहे, असे त्यांनी म्हटले आहे. तसेच राज्यसभा निवडणुकीत तिसरी जागाही जिंकणार, हे आम्ही ठामपणे सांगत होतो. आवश्यक नियोजन करून आम्ही विजय मिळवला, त्याचं श्रेय देवेंद्र फडणवीसांच्या रणनीतीला जात असे म्हणत त्यांनी विजयी उमेदवारांचं अभिनंदन केलं आहे.

ठाणे महानगरपालिकेत अटेंडंट, तंत्रज्ञ व अन्य पदांसाठी थेट मुलाखतीद्वारे भरती, 20000 ते 25000 रूपये पगाराची नोकरी

10 पास विद्यार्थ्यांसाठी सुवर्णसंधी! मिलिटरी हॉस्पिटल, अहमदनगर येथे विविध पदांसाठी भरती

संबंधित लेख

लोकप्रिय