Sunday, May 19, 2024
Homeराष्ट्रीयचंदीगड निवडणुक : आपचा ‘विजय’ सर्वोच्च न्यायालयाचा भाजपला मोठा धक्का

चंदीगड निवडणुक : आपचा ‘विजय’ सर्वोच्च न्यायालयाचा भाजपला मोठा धक्का

नवी दिल्ली : महापौर आणि उपमहापौर निवडणुकीत चंदीगडमध्ये मोठा गोंधळ निर्माण झाला होता. चंदीगडमध्ये निवडणूक आयोगाने आप पक्षाचे आठ मतं ही अवैध ठरवल्यानंतर त्या ठिकाणी भाजपचा महापौर निवडून आला होता. पीठासीन अधिकारी अनिल मसिह यांनी आठ मतांवर खाडोखोड करून अवैध ठरवली होती. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर एकच खळबळ उडाली होती.

चंदीगड निवडणुकीसंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने मोठा निकाल दिला आहे. जी आठ मतं निवडणूक अधिकाऱ्याने खाडोखोड करून अवैध ठरवली होती, ही मते आता वैध ठरवून चंदीगडच्या महापौर पदी आपचा उमेदवार घोषित करण्यात आला आहे. पीठासीन अधिकारी अनिल मसिह यांनी दिलेला निकाल सर्वोच्च न्यायालयाने रद्दबातल ठरवला आहे.

चंदीगड महापौरपदासाठी पुन्हा निवडणूक न घेता सध्याच्या मतपत्रिकांच्या आधारेच निकाल जाहीर केला जाईल, असं सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी स्पष्ट केलं होतं. त्यानंतर अवैध ठरवलेली आठही मते वैध ठरवून पुन्हा मतमोजणी करण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले होते. याच आपचे नगरसेवक कुलदीप कुमार यांचा विजय झाला आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा भाजपला मोठा धक्का बसला आहे.

दरम्यान, पीठासीन अधिकाऱ्याचे वर्तन दोन पातळ्यांवर घसरले आहे. प्रथमतः त्यांच्या वर्तणुकीमुळे, त्यांनी महापौर निवडणुकीचा मार्ग बेकायदेशीरपणे बदलला आहे. दुसरे म्हणजे, या न्यायालयासमोर खोटे निवेदन दिले, त्यामुळे संबंधित अधिकाऱ्याला जबाबदार धरले पाहिजे, असंही खंडपीठाने म्हटलं.

तसेच, चंदीगडमध्ये झालेली निवडणूक ही घोडेबाजार असल्याची टीकाही सर्वोच्च न्यायालयाने केली होती. तसेच फेरफार करणाऱ्या निवडणूक अधिकाऱ्यावर कारवाई करावी असे आदेशही सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. यासंदर्भातील वृत्त लाईव्ह लॉने दिलं आहे.

हेही वाचा :

नवरा सेक्स करत नाही म्हणून पत्नी पोहोचली पोलीस स्टेशनमध्ये…

All the best : राज्यात आजपासून 12वी ची परीक्षा सुरू

Mazagon Dock : माझगाव डॉक शिप बिल्डर्स लिमिटेड अंतर्गत भरती

Mumbai : सिडको अंतर्गत विविध पदांसाठी भरती

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय