Sunday, May 19, 2024
Homeकृषी५ नोव्हेंबरला देशभरात शेतकरी करणार चक्काजाम आंदोलन

५ नोव्हेंबरला देशभरात शेतकरी करणार चक्काजाम आंदोलन

महामार्ग बाधित शेतकर्‍यांना फेर सर्वे च्या निवाडा नोटीस बाबत हमीपत्र द्या – कॉ. दिगंबर कांबळे

शिरढोण (कवठेमहांकाळ) :  देशभरातील शेतकरी ५ नोव्हेंबर रोजी चक्काजाम आंदोलन करणार आहेत. याच पार्श्वभूमीवर अखिल भारतीय किसान सभा कवठेमहांकाळ येथे चक्काजाम आंदोलन करणार असल्याची माहिती किसान सभेचे जिल्हाध्यक्ष उमेश देशमुख व जिल्हा सेक्रेटरी दिगंबर कांबळे यांनी दिली.

किसान संघर्ष समन्वय समितीच्या ५ नोव्हेंबर २०२० रोजी देशभर करण्यात येणार्‍या शेतकरी प्रश्नावर चक्काजाम आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर शेतकर्‍यांच्या विविध प्रश्नांवर भव्य चक्काजाम आंदोलन करण्याचा एकमताने निर्णय आज येथे बैठकीत घेण्यात आला.

चक्काजाम आंदोलनाच्या प्रमुख मागण्या पुढीलप्रमाणे :

● महामार्ग बाधित शेतकर्‍यांना फेर सर्वे च्या निवाडा नोटीस बाबत हमीपत्र द्या. 

● केंद्र सरकारने पारित केलेले शेतकरी विरोधी विधेयक मागे घ्या.

● शिरढोण ता. कवठेमहांकाळ येथील महामार्ग बाधित क्षेत्रात रो फिक्स करा व नव्याने बाधित होणाऱ्या शेतकऱ्यांच्या बाधीत बांधकामे व बाधीत क्षेत्राचा सर्वे करून निवाडा नोटीस तातडीने द्या.

 

● अतिवृष्टी बाधित शेतकर्‍यांचा सदोष पंचनामे बंद करून सरसकट नुकसानभरपाई द्या.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय