Sunday, May 19, 2024
Homeपुणे - पिंपरी चिंचवडचैतन्य ग्रुप तर्फे विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन शिबिराचे आयोजन

चैतन्य ग्रुप तर्फे विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन शिबिराचे आयोजन

पुणे / क्रांतिकुमार कडुलकर : पुणे येथील चैतन्य ग्रुप तर्फे १५ ते २० वयोगटातील विद्यार्थ्यांसाठी गणेश कला क्रीडा मंच येथे शनिवार दिनांक २४ जुन रोजी पुणे येथे मार्गदर्शन शिबिर आयोजित करण्यात आले आहे. या शिबिरात आंतरराष्ट्रीय ख्यातीचे तज्ज्ञ मार्गदर्शन करणार आहेत. या कार्यक्रमासाठी आंतरराष्ट्रीय ख्यातीचे शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित असणार आहेत. याशिवाय बी. व्ही. जी. इंडिया चे हणमंतराव गायकवाड, एम. के. सी .एल. चे श्री.विवेक सावंत , पद्मश्री पोपटराव पवार, जेष्ठ करीअर मार्गदर्शक श्री विवेक वेलणकर हे मान्यवर देखील या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. या शिबिराच्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या व्यक्तींशी संवाद साधण्याची सुवर्ण संधी व आयुष्यभर पुरेल अशी प्रेरणा आणि स्फूर्ती विद्यार्थ्यांना या शिबिरातून मिळेल असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला आहे.



चैतन्य ग्रुप पुणे ही कोणतीही राजकीय संस्था नाही तर विविध क्षेत्रातील उच्चशिक्षित समविचारी लोकांचा एक ग्रुप आहे. यात अनेक अधिकारी, डॉक्टर्स, इंजिनियर्स, व्यावसायिक आहेत . या सर्वांनी एकत्र येऊन विद्यार्थ्यांकरिता कार्यक्रम करण्याचे नियोजन केलेले आहे. त्याचाच भाग म्हणून शनिवार दिनांक २४ जून २०२३ रोजी एकदिवसीय मोफत मार्गदर्शन शिबिराचे आयोजन केले आहे. यात आंतरराष्ट्रीय ख्यातीचे ज्येष्ठ शास्त्रज्ञ पद्मविभूषण डॉ रघुनाथ माशेलकर यांची करिअर आणि जीवनप्रवास या विषयावर प्रकट मुलाखत घेण्यात येणार आहे. MKCL चे मुख्य मार्गदर्शक श्री विवेक सावंत हसतखेळत करिअर मार्गदर्शन करणार आहेत.तर BVG India limited कंपनीचे सर्वेसर्वा श्री हणमंतराव गायकवाड स्वतःच्या यशाचे गमक सांगणार आहेत . पद्मश्री पोपटराव पवार हे विद्यार्थ्यांशी संवाद साधणार आहे तर करिअर मार्गदर्शक श्री विवेक वेलणकर १० वी आणि १२ वी नंतरचा करिअर निवडण्याचा मार्ग दाखवणार आहे.

अशी शैक्षणिक पर्वणी असणारा दिवसभराचा कार्यक्रम विद्यार्थी आणि पालक यांनी चुकवू नये असे आवाहन आयोजकांनी केलेले आहे. हा कार्यक्रम दि.२४ जून २०२२ रोजी सकाळी ९.३० वाजल्यापासून सायंकाळी ६:०० वाजेपर्यंत श्री गणेश कला क्रीडा मंच, स्वारगेट , पुणे येथे आयोजित करण्यात आलेला आहे. यासाठी खाली दिलेल्या लिंकवर जाऊन विद्यार्थ्यांनी नोंदणी करावी असे आवाहन सुध्दा आयोजकांनी केले आहे. या पत्रकार परिषदेस बार्टी च्या निबंधक, इंदिरा अस्वार, सी डॅक चे वरिष्ठ संचालक वसंत अवघडे, माजी पोलीस अधिक्षक के डी मिसाळ , जलसंपदा विभागाचे अधीक्षक अभियंता पुंडलिक थोटवे , डॉ.सुधीर पाटसुते वैद्यकीय अधिक्षक नायडू रुग्णालय , प्र विण आव्हाड पुणे महापालिका सहाय्यक आयुक्त , महेंद्र तूपसौदर , विठ्ठल सोनवणे उपस्थित होते .

महाराष्ट्र मिशन ड्रोन’ प्रकल्पाला तत्वतः मान्यता; अशी आहेत त्याची वैशिष्ट्ये


Video : सिक्कीममध्ये भयंकर भूस्खलन झाल्याने रस्ते बंद, जवानांकडून ३५०० पर्यटकांची सुटका


ब्रेकिंग न्यूज : MPSC मध्ये राज्यात तिसरी, पण मित्रासोबत फिरायला गेली अन् घात झाला ; वाचून हादराल

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय