Friday, February 21, 2025

महिलांसाठी कॅन्सर प्रतिबंधक लस पाच ते सहा महिन्यांत उपलब्ध होणार

नवी दिल्ली : महिलांना प्रभावित करणाऱ्या कॅन्सरविरोधी लस (Cancer Prevention Vaccine) लवकरच उपलब्ध होणार असून, ९ ते १६ वयोगटातील मुलींना ती दिली जाणार आहे. ही लस येत्या पाच ते सहा महिन्यांत केंद्र सरकारकडून मोफत दिली जाईल, अशी माहिती केंद्रीय आरोग्य, कुटुंब कल्याण आणि आयुष (स्वतंत्र प्रभार) मंत्री प्रतापराव जाधव यांनी दिली.

पत्रकार परिषदेत बोलताना जाधव म्हणाले की, “या लसीवर संशोधन जवळपास पूर्ण झाले असून, अंतिम चाचण्या सुरू आहेत. कॅन्सरवरील उपचारांसाठी लागणाऱ्या औषधांवरील कस्टम ड्युटी सरकारने माफ केली आहे.”

ही लस स्तन कॅन्सर, तोंडाचा कॅन्सर आणि गर्भाशयाच्या मुखाच्या (सर्व्हिकल) कॅन्सरवर प्रभावी ठरेल. त्यामुळे महिलांच्या आरोग्यासाठी हा मोठा निर्णय ठरणार असल्याचे त्यांनी सांगितले.

कॅन्सर प्रतिबंधासाठी लसीकरण आणि स्क्रिनिंग मोहीम

जाधव यांनी स्पष्ट केले की, देशभरातील आरोग्य केंद्रांमध्ये कॅन्सर प्रतिबंधासाठी व्यापक उपाययोजना हाती घेतल्या जात आहेत. ३० वर्षांवरील महिलांचे रुग्णालयांमध्ये स्क्रिनिंग केले जाणार असून, आजाराचे लवकर निदान होण्यासाठी डे-केअर कॅन्सर केंद्रे स्थापन करण्यात येतील. यामुळे महिलांना त्वरित उपचार मिळण्यास मदत होणार आहे.

WhatsApp Group Join Now
WhatsApp Channel Follow Now
Google News Follow Now

आयुष सुविधांचा विस्तार (Cancer Prevention Vaccine)

आरोग्य केंद्रांचे आयुष सुविधांमध्ये रूपांतर करण्याच्या निर्णयावर बोलताना जाधव म्हणाले की, “सध्या देशभरात १२,५०० आरोग्य केंद्रे कार्यरत असून, सरकार त्यांच्या संख्येत वाढ करत आहे. अनेक रुग्णालयांत आयुष विभाग आहे आणि नागरिक त्या सुविधांचा लाभ घेऊ शकतात.”

whatsapp link
google news gif

हे ही वाचा :

छत्रपती शिवाजी महाराजांचे गडकोट होणार जागतिक वारसास्थळ

धक्कादायक : इंधनात ८०% पाणी २०% पेट्रोल मिसळून विक्री

ज्ञानेश कुमार देशाचे नवे मुख्य निवडणूक आयुक्त; काँग्रेसकडून तीव्र विरोध

तुमचं UPI व्यवहार अयशस्वी झाल्यास आता त्वरित रिफंड मिळणार

आयपीएल 2025 चे वेळापत्रक जाहीर, 22 मार्चपासून रंगणार खेळ

दिल्ली-एनसीआरमध्ये भूकंपाचे जोरदार धक्के, पंतप्रधान मोदींनी केले आवाहन

ग्रामीण डाक सेवकांच्या रिक्त पदांसाठी भरती, वाचा संपुर्ण माहिती

Related Articles

- Advertisement -

Latest Articles