BCCI announces schedule for TATA IPL 2025 : भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (BCCI) ने टाटा आयपीएल 2025 च्या वेळापत्रकाची अधिकृत घोषणा केली आहे. या प्रतिष्ठित स्पर्धेचा 18 वा हंगाम 22 मार्च 2025 पासून सुरू होणार असून, अंतिम सामना 25 मे 2025 रोजी खेळवला जाईल. (IPL 2025 Schedule)
यंदाच्या हंगामात एकूण 74 सामने 13 विविध स्थळांवर खेळवले जाणार असून, 12 दुहेरी सामने (डबल हेडर्स) असतील. दुपारच्या सामन्यांची वेळ 3:30 वाजता तर संध्याकाळच्या सामन्यांची वेळ 7:30 वाजता ठेवण्यात आली आहे.
स्पर्धेचा पहिला सामना गतविजेता कोलकाता नाइट रायडर्स (KKR) आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू (RCB) यांच्यात कोलकात्याच्या ऐतिहासिक ईडन गार्डन्स मैदानावर 22 मार्च रोजी रंगणार आहे. तर पहिला दुहेरी सामना 23 मार्च रोजी होईल, जिथे सनरायझर्स हैदराबाद (SRH) आणि राजस्थान रॉयल्स (RR) यांच्यात दुपारी लढत होईल, तर संध्याकाळी पाच वेळचे विजेते चेन्नई सुपर किंग्स (CSK) आणि मुंबई इंडियन्स (MI) यांच्यात चेन्नईतील एम.ए. चिदंबरम स्टेडियमवर थरार रंगेल.
दिल्ली कॅपिटल्स (DC) आणि लखनऊ सुपर जायंट्स (LSG) यांचा पहिला सामना 24 मार्च रोजी विशाखापट्टणम येथे होईल. तर जगातील सर्वात मोठ्या क्रिकेट स्टेडियम नरेंद्र मोदी स्टेडियम, अहमदाबाद येथे गुजरात टायटन्स (GT) आणि पंजाब किंग्स (PBKS) यांचा सामना 25 मार्च रोजी होणार आहे.


हे ही वाचा :
महाकुंभासाठी निघालेल्या भाविकांचा गाडीचा भीषण अपघात, 10 जणांचा मृत्यू, 19 जखमी
रस्ता ओलांडणाऱ्या बिबट्या आणि दुचाकीस्वाराची जोरदार धडक, पुढे काय झाले पहा !
प्रेमात अडथळा ठरत असल्याने आईसमोर ५ वर्षांच्या चिमुरड्याचा खून, मृतदेह फेकला नदीत
CIBIL स्कोअरमुळे मोडलं लग्न ; आर्थिक इतिहास पाहुन वधूपक्षाला धक्का !
अंगणवाडीत विविध पदांसाठी भरती ; मंत्री आदिती तटकरे यांनी दिली महत्वाची माहिती