जमिनी भांडवलदारांच्या घशात घालण्याचा ठाव – कविता वरे
ठाणे : भीमाशंकर इको सेन्सिटिव्ह झोन रद्द करण्यासाठी मुरबाड तालुक्यामध्ये अखिल भारतीय किसान सभेच्या वतीने विरोध सभा पार पडली. या सभेला कॉम्रेड कविता वरे, कॉ. पी. के. लाली यांनी संबोधित केले.
केंद्र सरकारने पर्यावरण संरक्षणाच्या नावाखाली देशात विविध अभयारण्याच्या लगतच्या गावातील जमिनी इको सेन्सिटिव्ह झोन मध्ये समाविष्ट करून भांडवलदारांच्या घशात घालण्याचा डाव आखलेला आहे. भीमाशंकर अभयारण्य लगतच्या ४२ गावांचा समावेश भीमाशंकर इको सेन्सिटिव्ह झोन मध्ये करण्याचे प्रस्तावित आहे, त्यास स्थानिकांचा तीव्र विरोध आहे. जनतेच्या या लढ्याला किसान सभा सुरवातीपासून प्रखरतेने पुढे घेऊन जात असल्याचे कविता वारे म्हणाल्या.
ठाणे जिल्हा किसान सभेच्या वतीने मुरबाड तालुक्यामध्ये यासंदर्भातील विरोध सभा डोंगर न्हावे व जाम्बुर्डे गाव येथे घेण्यात आल्याचे पी. के लाली यांनी सांगितले.
या सभेमध्ये इको सेन्सिटिव्ह झोन आपण का नाकारत आहे व त्याचे होणारे परिणाम प्रखरतेने मांडले, जमीन आपण कोणत्याही अवस्थेत सोडणार नाही. असा निर्धार सर्व ग्रामस्थांच्या वतीने त्यांनी प्रकट केला. या सभेला गावातील ग्रामस्थां ची उपस्थिती होती.