मुंबई, दि. २५ : सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागातंर्गत कार्यरत असलेल्या संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळामार्फत चर्मकार समाजातील व्यक्तींचा शैक्षणिक, आर्थिक व सामाजिक विकास होण्यासाठी सन 2024-25 या वर्षासाठी विविध केंद्र व राज्य शासनाच्या योजना राबविल्या जाणार आहेत. या योजनांसाठी अर्ज करण्याचे आवाहन संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळाचे मुंबई उपनगरचे जिल्हा व्यवस्थापक राजेंद्र दगडखैर यांनी केले आहे. (scheme)
केंद्र व राज्य शासनाच्या महामंडळामार्फत 50 टक्के अनुदान योजना, बीज भांडवल योजना, मुदती कर्ज योजना, लघुऋण वित्त योजना, महिला समृद्धी योजना, महिला अधिकारीता योजना, शैक्षणिक कर्ज योजना, सुविधा ऋण, उत्कर्ष ऋण या योजना राबविल्या जाणार आहेत. (scheme)
या कर्ज योजनेसाठी अर्ज करताना अर्जदारांनी पुढील कागदपत्रे अर्जासोबत जोडावीत. १)जातीचा दाखला, उत्पन्नाचा दाखला, रहिवासी दाखला, रेशनकार्ड, आधार कार्ड, मतदान कार्ड, २) शैक्षणिक दाखला, तीन फोटो कॉपीज, पॅन कार्ड, लाभार्थी उद्योग आधार प्रमाणपत्र, ३) ज्या ठिकाणी व्यवसाय करावयाचा असेल त्या (जागेचा पुरावा जागेचे वीजबिल, कर/भाडे पावती/भाडे करारनामा/जागा वापर संमती पत्र किंवा मालकी हक्काचा पुरावा इ.)४) कागदपत्र खरी असल्याबाबत लाभार्थ्यांचा विनंती अर्ज व ज्या जागी व्यवसाय चालू आहे त्याच जागेचे प्रमाणित केलेल छायाचित्र. ५) ग्रामपंचायत, नगरपालिका अथवा महानगरपालिका यांचे ना हरकत प्रमाणपत्र. ६) व्यवसायासबंधी तांत्रिक प्रमाणपत्र तसेच अनुभवाचा दाखला. ७) आवश्यकतेनुसार प्रकल्प अहवाल, सी ए च्या सही व शिक्यासह. ८) खरेदी करावयाच्या मालमत्तेच्या साहित्याचे जी.एस.टी. क्रमांक असलेले दरपत्रक (कोटेशन) ९) अर्जदाराचे वारसदाराच्या स्वाक्षरीसह नामांकन शपथपत्र (रु.१००/- च्या स्टॅम्प पेपरवर) १०) अर्जदाराचे तसेच जामीनदारांचे विहीत नमुन्यातील शपथपत्र (रु.१००/- च्या स्टॅम्प पेपरवर)११) लाभार्थाचा आधारकार्ड क्रमांक तसेच आधार संलग्न (Link) बँक खाते क्रंमाक. १२) दोन सक्षम जामिनदार (नोकरदार किंवा मालमत्ताधारक/शेतकरी)
१३) सक्षम दोन जामीनदार अ २ शासकीय जामीनदारांच्या कार्यालयाचे हमीपत्र अथवा ब २ शेतकरी / मालमत्ताधारक यांचे सात बारा/नमुना क्र. आठच्या उताऱ्यावर सक्षम अधिकाऱ्याची सही व शिक्क्यानुसारची उतारे सोबत सहायक दुय्यम निबंधक अथवा गर्व्हमेंट व्हॅल्यूवर यांचे सबंधिक मालमत्तेचे मूल्यांकन पत्र अथवा प्रमाणपत्र आवश्यक. १४) बॅकेचा सीबिल रिपोर्ट.
scheme
या योजनांचा लाभ घेण्यासाठी अर्जदार हा चर्मकार समाजातील (चांभार, ढोर, होलार, मोची) असावा. तसेच अर्जदाराने यापूर्वी महामंडळाच्या कुठल्याही योजनेचा लाभ घेतलेला नसावा. लाभ घेऊ इच्छिणाऱ्या अर्जदाराने आवश्यकतेनुसार कागदपत्रांची पूर्तता करुन या योजनेचे तीन प्रतीत कार्यालयीन वेळेत जिल्हा कार्यालय, मुंबई उपनगर गव्हर्नमेंट लेदर वर्किग स्कूल कंपाऊड, खेरवाडी, वांद्र (पूर्व) मुंबई- 400051 येथे स्वतः अर्जदाराने मूळ कागदपत्रांसह उपस्थित राहून कर्ज प्रस्ताव दाखल करावे, असे प्रसिद्धी पत्रकात नमूद केले आहे.
हेही वाचा :
मोठी बातमी : राज ठाकरे यांनी केली मोठी घोषणा
ज्येष्ठ साहित्यिक आणि सामाजिक कार्यकर्ते फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांचे निधन
रविकांत तुपकर यांनी केली नवीन पक्षाची स्थापना, विधानसभेच्या २५ जागा लढवणार
ब्रेकिंग : अजिंक्य नाईक यांची मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदी निवड
मोठी बातमी : अर्थसंकल्पात सोने-चांदीच्या दरात मोठी कपात, वाचा किती झाले कमी !
मोठी बातमी : मनोज जरांगे पाटील यांच्याविरुद्ध अजामीनपात्र वॉरंट जारी
ब्रेकिंग : मराठा समाजातील विद्यार्थ्यांसाठी राज्य सरकारचा मोठा निर्णय
मोठी बातमी : MPSC मार्फत सहयोगी प्राध्यापकासह विविध पदांसाठी मुलाखत