Saturday, May 18, 2024
HomeNewsपिंपळेसौदागरला स्मार्ट करून लक्ष्मणभाऊंनी जनतेच्या ऋणाची उतराई केली; मी सुद्धा त्यांचीच अर्धांगिनी,...

पिंपळेसौदागरला स्मार्ट करून लक्ष्मणभाऊंनी जनतेच्या ऋणाची उतराई केली; मी सुद्धा त्यांचीच अर्धांगिनी, विकासाचाच कित्ता गिरवणार – अश्विनी लक्ष्मण जगताप

पिंपरी चिंचवड/क्रांतिकुमार कडुलकर:दि.१८ – दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप पिंपळेसौदागरचा स्मार्ट सिटीत समावेश करून या भागाचा सर्वाधिक विकास केला. त्यांची विकासाची दूरदृष्टी शहरातील इतर कोणत्याही भागापेक्षा पिंपळेसौदागरकरांना जास्त लाभली. पिंपळेसौदागरचा स्मार्ट सिटीत कायापालट झाला. इतर राजकीय पक्षांपेक्षा भाजपने या भागाच्या विकासात जास्त योगदान दिले आहे. येथील जनतेच्या ऋणातून भाजप आणि दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांनी विकास करून उतराई होण्याचा प्रयत्न केला. मीही लक्ष्मण जगताप यांचीच अर्धांगिनी आहे. मी सुद्धा आमदार झाल्यानंतर माझ्या पतीचाच विकासाचा कित्ता गिरवणार आहे. त्यासाठी पिंपळेसौदागरकरांनी मला भरघोस मतांनी निवडून द्यावे, असे आवाहन भाजपच्या उमेदवार अश्विनी जगताप यांनी शनिवारी केले.

पोटनिवडणुकीतील भाजप, शिवसेना, आरपीआय (आठवले गट), रासप, शिवसंग्राम संघटना, रयत क्रांती संघटना, प्रहार संघटना महायुतीच्या उमेदवार अश्विनी लक्ष्मण जगताप यांनी शनिवारी पिंपळेसौदागरमध्ये पदयात्रा काढली. गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये जाऊन नागरिकांसोबत संवाद साधला. यावेळी माजी उपमहापौर नानी घुले, माजी नगरसेविका निर्मला कुटे, सोनाली गव्हाणे, नगरसेवक शत्रुघ्न काटे, सारिका बाऱ्हाडे, कुंदा भिसे, गिरीश जाचक, सोमनाथ काटे, संतोष नवले, नवीन लायगुडे, कपिल कुंजीर, अतुल पाटील, जयनाथ काटे, संजय भिसे आदी उपस्थित होते.


अश्विनी जगताप म्हणाल्या, “दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांनी चिंचवड मतदारसंघातील सर्वच जनतेवर कुटुंबासारखे प्रेम केले. पण पिंपळेसौदागरच्या जनतेवर त्यांनी जरा जास्तच प्रेम केले. कारण शहराचा स्मार्ट सिटीत समावेश होताच पिंपळेसौदागरचा कायापालट करण्याचा निर्णय त्यांनी घेतला. या भागात स्मार्ट सिटीअंतर्गत अनेक विकासकामे त्यांनी केली. प्रशस्त रस्ते केले. मैदाने, उद्याने विकसित केली. शहराच्या अन्य भागांपेक्षा जास्त विकास हा पिंपळेसौदागरचा झालेला आहे. हे सर्व करण्यासाठी दिवंगत लक्ष्मण जगताप यांनीच पुढाकार घेतला होता. त्यामुळे येथील जनतेने भाजपला साथ द्यावी. मी लक्ष्मण जगताप यांचीच अर्धांगिनी आहे. आमदार झाल्यानंतर माझ्या पतीचाच विकासाचा कित्ता गिरवणार आहे. कोणी कितीही वल्गना करत असले तरी आमदार लक्ष्मण जगताप यांनीच पिंपळेसौदारचा कायापालट केला आहे, हे सत्य आहे. त्यामुळे येथील जनता भाजपलाच विजयी करेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.”

अश्विनी लक्ष्मण जगताप यांच्या आवाहनाला पिंपळेसौदागरकरांनीही उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. पिंपळेसौदागरच्या विकासात दिवंगत लक्ष्मण जगताप यांचे योगदान कोणीही नाकारू शकणार नाही. त्यामुळे आम्ही भाजपसोबत असल्याचे गृहनिर्माण सोसायट्यांतील नागरिकांनी सांगितले. आम्ही भाजपलाच विजयी करणार असल्याचा निर्धार या नागरिकांनी व्यक्त केला.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय