Saturday, May 18, 2024
Homeजिल्हाविशेष : भारतात आकाशातून पक्षी पडतायत पण का? वाचा !

विशेष : भारतात आकाशातून पक्षी पडतायत पण का? वाचा !

पर्यावरण / श्रेयस सवाखंडे : बदलतं पर्यावरण खरोखरचं घातक आहे ही गोष्ट आपल्याला माहिती आहेच. पण 2.0 सिनेमात दाखवल्याप्रमाणे खरंच पक्षी आकाशातून पडतायत का?

बिझीनेस इंसायडर या अमेरिकन वेबसाईट अनुसार  “भारतात रेकॉर्डब्रेक उष्णतेच्या लाटेमुळे पाण्याचे स्रोत आटत चालल्याने भारतात पक्षी आकाशातून पडतायत”. याच वेबसाईटच्या हवाल्यानूसार अहमदाबाद मधील प्राणी रुग्णालयातील तज्ज्ञांनी हे स्पष्ट केलेलं आहे की त्यांनी मागील काही आठवड्यात हजारो पक्ष्यांवरती उपचार केलेत.

वाढत्या तापमानाचे परिणाम खरंच किती घातक आहेत, याचा अंदाज ‘येल क्लायमेट कनेक्शन’ या जगद्विख्यात माध्यमाच्या ‘भारत आणि पाकिस्तानमध्ये अत्यंत घातक अशी उष्णतेची लाट पुन्हा येऊ शकते’ या शीर्षकाखालील लेखातून येऊ शकते. ज्या अनुसार “भारत व पाकिस्तानातील वाढतं तापमान 50 अंश सेल्सियस म्हणजे 122 फॅरेनहाईट पर्यंत पोहोचलयं. अशाप्रकारची उष्णता जेव्हा अतिआर्द्रतेबरोबर असते तेव्हा त्यामुळे हिट स्ट्रेस तयार होऊन अत्यंत घातक परिस्थिती ओढावू शकते. खासकरुन किनारी प्रदेश व सिंधू घाटी प्रदेशात याचा प्रभाव दिसू शकतो. अशाप्रकारे धोकादायकपणे उच्चपातळीच्या उष्णतेचा ताण निर्माण होईल जो विस्तारित कालावधीसाठी बाहेरील लोकांसाठी जगण्याची मर्यादा गाठेल किंवा ओलांडेल.”

वाढत्या ग्लोबल वॉर्मिंगचे घातक परिणाम आता दिसू लागले आहेत. पर्यावरण बदलामुळे हे बदल कित्येकपट घातक झाले आहेत. ब्रिटीश अर्थतज्ज्ञ उमर हक यांच्यानुसार “आपण आता नामशेष काळाजवळ येऊन ठेपलोय आणि आपण ज्या परिस्थितीमध्ये तग धरून राहणे अवघड आहे अशा पातळीपर्यंत येऊन पोचलो आहे. यामुळे भारताच्या वायव्य सीमेजवळ अनेक पक्षी आकाशातून पडत आहेत. प्राणी बेहाल झाले आहेत. उमर हक यांच्यांमते 50-60 अंश सेल्सियस ही जगण्यासाठी आवश्यक परिस्थितीचा सीमाबिंदू आहे.त्या बिंदूनंतर काहीही काम करत नाही.” 

प्राणी मरतात आणि यंत्रणा बंद पडते, अर्थव्यवस्था उद्ध्वस्त होते, महागाई गगनाला भिडते, लोक गरीब होत जातात, परिणामी फॅसिझमचा उद्रेक होतो. लोक भयभीत होतात आणि “त्यांना उत्तरे देण्यासाठी” मूलतत्त्ववादी धर्म किंवा हुकूमशाही शासनाकडे वळतात. नियमित अर्थशास्त्र आणि राजकारण यापुढे काम करत नाही.”. ही फार घातक धोक्याची घंटा आहे. याकडे दुर्लक्ष करणे आपल्या हिताचे नाही. त्यामुळे यासंबंधी योग्य ती पावले उचलण्यासाठी आपण सरकार वर दबाव आणायला हवा. अन्यथा भविष्य अंधकारमय असू शकते. 

विशेष लेख : “जागतिक उष्णता वाढ हे शतकातील पृथ्वी पुढील मोठे संकट ” – ॲड. गिरीश राऊत

विशेष लेख :  चला तर समजून घेऊ – मासिक पाळी


संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय