Sunday, May 19, 2024
Homeशिक्षणविद्यापीठात नवीन १ हजार विद्यार्थी क्षमतेचे वाचन कक्ष उभा करा – SFI

विद्यापीठात नवीन १ हजार विद्यार्थी क्षमतेचे वाचन कक्ष उभा करा – SFI

विद्यापीठातील १००० पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी निवेदनावर केल्या सह्या

औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात नवीन १ हजार विद्यार्थी क्षमतेचे वाचन कक्ष उभा करा, अशी मागणी स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडियाच्या वतीने कुलगुरू डॉ.प्रमोद येवले यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे. या निवेदनावर विद्यापीठातील १००० पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी निवेदनावर सह्या केल्या आहेत.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नाव असून जगभरात  डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना ज्ञानाचे प्रतिक म्हणून ओळखले जाते. डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाला  लागून नागसेनवन परिसर ही डॉ. बाबासाहेबांची कर्मभुमी राहिलेली आहे. म्हणून मराठवडा, विदर्भ, खानदेश, आणि उर्वरित महाराष्ट्रतून मोठ्या प्रमाणात शेतकरी, शेतमजूर व तळागाळातील शिक्षण घेणाऱ्या पहिल्या पिढीचे विद्यार्थी मोठ्या प्रमाणात येतात. आर्थिक परिस्थिती हालाखीची असल्यामुळे गोरगरीब विद्यार्थी व्यक्तिगत पातळीवर सोयी सुविधा उपलब्ध करून घेऊ शकत नाहीत. म्हणून स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडिया ने या निवेदनाद्वारे विद्यापीठ परिसरात एक हजार विद्यार्थ्यांना सर्व सोयीयुक्त तसेच तांत्रिक दृष्टया सक्षम अशा वाचन कक्षाची निर्मिती व्हावी अशी मागणी केली आहे.

या निवेदनावर जिल्हा सचिव अशोक शेरकर, जिल्हा उपाध्यक्ष मनीषा बल्लाळ, गणेश अलगुडे, विश्वजीत काळे, विद्यपीठ अध्यक्ष अरुण मते, सचिव अनुजा सावरकर, रोहिणी नवले, राजेश डोगरदिवे, मुनिर सय्यद, कृष्णा रकटे, नोबेल हजारे, प्रकाश वाव्हळे, आकांशा कांबळे, प्रिया झरे, यांच्या सह विद्यपीठ परिसरातील एक हजार पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी या निवेदनावर सह्या करून मागणीला पाठींबा दिला.

Lic life insurance corporation
संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय