Monday, September 16, 2024
Homeआंतरराष्ट्रीयNamibia : नामिबियात भीषण दुष्काळ - अन्नासाठी 700 हून अधिक जंगली प्राणी...

Namibia : नामिबियात भीषण दुष्काळ – अन्नासाठी 700 हून अधिक जंगली प्राणी मारून लोकांना जगवण्याचे आदेश

नामिबिया : समृध्द वन्यजीवन, विविध प्राणी आणि लँडस्केपसाठी प्रसिद्ध असलेल्या आफ्रिका खंडातील नामिबिया (Namibia) देश आता शतकातील सर्वात भीषण दुष्काळाचा सामना करत आहे.

दक्षिण आफ्रिकेतील नामिबिया मध्ये भीषण दुष्काळ पडला आहे. आफ्रिका खंडात सध्या अनेक देशात मोठा दुष्काळ पडला आहे. मात्र नामिबिया मध्ये भीषण भुकमारी, पाणी टंचाई आहे. सध्याचा दुष्काळ व्यापक आणि विनाशकारी आहे, असे नामिबियातील जागतिक वन्यजीव निधीचे संचालक ज्युलियन झेडलर यांनी न्यूयॉर्क टाइम्सला सांगितले आहे. (Namibia)

दुष्काळाने देशातील सुमारे 84 टक्के अन्नधान्य साठा संपला असून लोक भुके कंगाल झाले आहेत. देशाच लोकसंख्या २.५ कोटी आहे. यातील सुमारे अर्ध्या लोकांपुढे गंभीर अन्न संकट निर्माण झाले आहे. या अभूतपूर्व संकटावर मात करण्यासाठी नामीबिया सरकारने राखीव जंगलातील वन्यप्राणी मारण्याचे आणि त्यांचे मांस लोकांना उपलब्ध करून देण्याचे सरकारी आदर्श तातडीने जारी केले आहेत

यामध्ये डझनभर हत्ती, पाणघोडे यांसह 700 पेक्षा अधिक वन्य प्राण्यांना मारण्याची योजना तयार केली आहे. आफ्रिका खंडातील इतर देशांपेक्षा नामिबिया मध्ये गेल्या शतकातील भीषण अशा दुष्काळी परिस्थितीत नागरिक भुकेने व्याकूळ झाले आहेत.

आमच्या नागरिकांना भुकमारी पासून वाचवण्यासाठी तातडीने वन्यजीव मारून आम्ही लोकांचे प्राण वाचवण्यासाठी आता प्राण्यांची हत्या करत आहे. सुरवातीला सरकार हत्तींना मारून त्यांचे मांस लोकांमध्ये वाटप करत आहे. झेब्रा-वाइल्डबीस्ट मारण्याची ही योजना नामिबियात आखण्यात आली आहे. जेणेकरबन लोकांचे प्राण वाचतील त्यांची भूक भागवली जाईल.

नामीबिया सरकारच्या पर्यावरण मंत्रालयाने यासंबंधी लिखित आदेश जारी केले आहेत. सरकारने 83 हत्ती, 300 झेब्रा, 30 पाणघोडे, 60 म्हशी यांसह एकूण 723 प्राणी मारून त्यांचे मांस जनतेला खायला देण्याचा आदेश दिला आहे. काही वर्षांपूर्वी आलेल्या दुष्काळात सरकारने 200 हून अधिक प्राण्यांना मारण्याचा आदेश दिला होता.

whatsapp link
google news gif

हेही वाचा :

मी महाराष्ट्रातील 13 कोटी जनतेची माफी मागतो – अजित पवार

मोठी बातमी : ‘म्हाडा’च्या ३७० सदनिकांच्या विक्री किंमतीत १० ते २५ टक्क्यांपर्यंत कपात

शिवरायांचा पुतळा कोसळण्याची कारणे शोधण्यासाठी नौदल-राज्य शासनाची संयुक्त तांत्रिक समिती

मोठी बातमी : राजकोट किल्ल्यावर मोठा राडा, शिवरायांच्या पुतळ्या राजकारण तापले

“घरात खेचून एकेकाला रात्रभर मारून टाकेन” नारायण राणे यांची जीवे मारण्याची धमकी

Telegram : टेलिग्रामवर भारतात बंदी येणार ? वाचा काय आहे प्रकरण !

शासकीय, निमशासकीय विभागात हजारो विविध पदांसाठी भरती, वाचा एका क्लिकवर !

खूशखबर ; भारतीय रेल्वेमध्ये 14,298 टेक्निशियन पदांसाठी मोठी भरती होणार

बृहन्मुंबई महानगरपालिकेमध्ये 1846 पदांची मेगा भरती, आजच अर्ज करा

कोचीन शिपयार्ड लिमिटेड अंतर्गत विविध पदांसाठी मोठी भरती

संबंधित लेख

लोकप्रिय