टेक्सास : लोकसभेचे विरोधी पक्षनेते आणि काँग्रेसचे नेते राहुल गांधी हे सध्या अमेरिकेच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात त्यांनी वॉशिंग्टन डीसी येथील जॉर्जटाउन विद्यापीठाला भेट दिली. त्यांनी स्वतःची राजकीय भूमिका परखडपणे मांडली आहे. (Rahul Gandhi)
भारत भाषा, परंपरा, धर्म, जात अशी विविधता आहे, विविधता आणि एकता असलेले भारत हे मोठे लोकशाही राष्ट्र आहे. भारतीय लोक आपल्या धार्मिक स्थळांवर जातात, त्यावेळी ते विलीन होऊन जातात. भारताचा हा स्वभाव आहे. भारत वेगवेगळ्या गोष्टींचा एक समूह आहे हा भाजपा आणि आरएसएसचा गैरसमज आहे. नरेंद्र मोदी मला आवडतात. मी त्यांचा द्वेष करत नाही. त्यांचा जो दृष्टीकोन आहे, त्याच्याशी मी सहमत नाहीय. पण म्हणून मी त्यांचा द्वेष करत नाही. त्यांच्याबद्दल मला सहानुभूती सुद्धा आहे,” असे मत राहुल गांधींनी व्यक्त केले.
जनतेचा आवाज बुलंद करणे हे विरोधी पक्षाचे काम आहे.
राहुल गांधी अमेरिकेत टेक्सास येथील विद्यापीठात म्हणाले की, सर्व काही चीन मधून येत आहे, चीनने त्यांच्या देशात उत्पादनावर भर दिला. त्यांच्या सर्व वस्तू भारतात विकल्या जात आहेत, भारतात उत्पादनाकडे लक्ष राहिले नाही, त्यामुळे इथे बेरोजगारी आहे.बोलण्यापेक्षा ऐकणे महत्वाचे आहे. देशातील प्रत्येक घटकांचे म्हणणे काय आहे, हे समजून घेणे, जनतेचा आवाज कुठे कसा बुलंद करता येईल याचा विचार नेता म्हणून विरोधी पक्षाला करावा लागतो. संसदेत युद्धासारखी परिस्थिती आहे. तिथे जनतेचे प्रश्न मांडावे लागतात. (Rahul Gandhi)
देशातील महत्वाच्या संविधानिक संस्था आणि यंत्रणा आणि माध्यमावर आरएसएस चे नियंत्रण आहे. सरकारने केवळ दोन लोकांसाठी काम करायचे नसते, तर सर्व समाज घटकांचा विचार करावा लागतो. ऐन निवडणुकीच्या काळात विरोधकांचे बँक अकाऊंट सिल करणे किंवा केंद्रीय यंत्रणांचा दुरुपयोग कारणे पूर्णतः चुकीचे आहे, लोकांच्या आता सर्व लक्षात आले आहे. ओबीसी, दलितांची फसवणूक करण्यात आली आहे, मात्र लोकसभा निवडणूक निकालानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आत्मविश्वास गमावला आहे.
राहुल गांधीचा विरोधी पक्ष नेता म्हणून निवड झाल्यानंतर अमेरिकेचा हा पहिला दौरा होता.