Monkey Pox : सध्या जगभरात मंकीपॉक्स (Monkey pox) या संसर्गजन्य आजाराचे प्रमाण वाढत आहे, त्यामुळे सर्वत्र चिंता व्यक्त केली जात आहे. आरोग्य मंत्रालयाने नुकतेच भारतात मंकीपॉक्सचा एक संशयित रुग्ण आढळल्याचे जाहीर केले आहे. या रुग्णाला तातडीने रुग्णालयात दाखल करून विलगीकरणात ठेवण्यात आले आहे, तसेच त्याची स्थिती सध्या स्थिर असल्याचे सांगितले गेले आहे.
मंकीपॉक्स रुग्णांची वाढती संख्या पाहता, जागतिक स्तरावर जागरूकता निर्माण केली जात आहे आणि काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. भारतातील संशयित रुग्ण हा परदेशातून आलेला असल्यामुळे त्याचा तपास सुरू आहे. त्याच्या रक्ताच्या चाचण्या घेतल्या जात आहेत आणि अंतिम निष्कर्षानंतर पुढील उपचाराची योजना आखली जाणार आहे. सध्या रुग्णावर लक्ष ठेवण्यात येत आहे आणि तो इतरांपासून वेगळा ठेवण्यात आला आहे.
मंकीपॉक्सचा उद्रेक सध्या मध्य आणि पश्चिम आफ्रिकेतील काही देशांमध्ये मोठ्या प्रमाणात झाला आहे, जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) या भागात आणीबाणी जाहीर केली आहे. गेल्या तीन वर्षांत दुसऱ्यांदा ही आणीबाणीची परिस्थिती निर्माण झाली आहे. या आजाराचे स्वरूप देवीसारखे आहे, परंतु मंकीपॉक्सचा प्रसार तुलनेने कमी झपाट्याने होतो.
मंकीपॉक्स झाल्यावर रुग्णाला सातत्याने ताप येणे, डोकेदुखी, स्नायू दुखणे, सूज येणे आणि अंगावर पुरळ उठणे यांसारखी लक्षणे दिसतात. पुरळ चेहऱ्यावरून सुरुवात होऊन संपूर्ण अंगावर पसरतात. ही लक्षणे दोन ते चार आठवड्यांपर्यंत राहतात. हा आजार गर्भवती महिलांवर विशेषतः गंभीर परिणाम करतो.
Monkey Pox
मंकीपॉक्स हा आजार संसर्गजन्य आहे. जर एखादी व्यक्ती मंकीपॉक्स झालेल्या रुग्णाच्या संपर्कात आली किंवा संक्रमित प्राण्यांच्या संपर्कात आली, तर हा आजार पसरण्याचा धोका असतो. विशेषतः खोकल्याद्वारे याचा प्रसार होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय प्रवास करणाऱ्या नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन आरोग्य तज्ज्ञांकडून केले जात आहे.
हेही वाचा :
मोठी बातमी : कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांना टोल माफी
मोठी बातमी : ‘आद्यक्रांतीकारक राघोजी भांगरेंचे’ नाव राज्यातील ‘या’ मोठ्या धरणाला
मी महाराष्ट्रातील 13 कोटी जनतेची माफी मागतो – अजित पवार
मोठी बातमी : ‘म्हाडा’च्या ३७० सदनिकांच्या विक्री किंमतीत १० ते २५ टक्क्यांपर्यंत कपात
शिवरायांचा पुतळा कोसळण्याची कारणे शोधण्यासाठी नौदल-राज्य शासनाची संयुक्त तांत्रिक समिती