पिंपरी चिंचवड / क्रांतीकुमार कडुलकर : घरकुल वसाहत( EWS) चिखली या ठिकाणी काल वक्रतुंड हाऊसिंग सोसायटी F8 या बिल्डिंगमध्ये सुरेश विठ्ठल जाधव यांच्या सहकार्यातून सोलर प्रोजेक्टचे उद्घाटन करण्यात आले. (PCMC)
घरकुल ही आर्थिक दुर्बल घटकासाठी बांधलेली केंद्र सरकारची योजना असून या ठिकाणी जवळपास 158 सोसायटी असून यामध्ये घरकुल सोलर सिटी करण्याकडे नागरिकांचा कल दिसत आहे.
वेगवेगळ्या माध्यमातून आतापर्यंत घरकुल मध्ये सत्तावीस सोसायटी मध्ये सोलर पॅनल बसवलेले आहेत.
यामध्ये सामाजिक कार्यकर्ते सुरेश विठ्ठल जाधव यांनी जवळपास सहा सोसायटींना त्यांच्या आर्थिक सहकार्यातून सोलर प्रोजेक्ट उभा केला आहे.
त्यामुळे या सहा सोसायटीमध्ये प्रत्येकी 15 ते 20 हजाराचे विद्युत बिल हे झिरो झालेले आहे. सोसायटीचे एकूण खर्चामध्ये लाईट बिल हा मोठा भाग असतो आणि तो कमी करण्याच्या संदर्भामध्ये यातील काही नागरिक काम करतात. तसेच केंद्रसरकारच्या ग्रीन एनर्जी आणि पर्यावरणपूरक या प्रोजेक्टसाठी तेथील सामाजिक कार्यकर्ते अशोक मगर यांनी सुरुवातीच्या काळात पाच सोसाट्यांना सीएसआर फंडातून सोलर प्रोजेक्ट केला आहे. इतरांनीही सुद्धा वेगवेगळ्या मार्गाने आर्थिक सहाय्य लोन करून वेगवेगळ्या प्रकारे जवळपास आज 27 सोसायटीमध्ये सोलर उभा आहे. पुढील काळात या ठिकाणी संपूर्ण घरकुल सोलर दिसेल असे सामाजिक कार्यकर्ते अशोक मगर यांनी सांगितले.
सामाजिक भावनेतून आपल्याकडून ही समाजाला काहीतरी देणं लागतं या विचाराने प्रेरित होऊन समाजासाठी काहीतरी करायचं हा विचार धरला होता त्यावेळेला हा सोलर प्रोजेक्ट मला आवडला यामुळे सोसायटीचे जर पैसे कमी होणार असेल तर निश्चितच सहभाग घेऊ असं म्हणून आतापर्यंत सहा सोसायटींना सोलर प्रोजेक्टसाठी आर्थिक सहाय्य केलं असे सुरेश विठ्ठल जाधव यांनी सांगितले.
पुढील काळातही जे शक्य होईल त्याप्रमाणे या घरकुल सोलर सिटी साठी आर्थिक सहाय्य करू असे सांगितले. तसेच घरकुलच्या बाबतीत माझ विशेष प्रेम असून या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारे मी घरकुला सहाय्य करत असतो जसं की सोलर साठी काम केलं तसंच काही सोसायटीमध्ये पेविंग ब्लॉकची सुद्धा मी काही सोसायटीमध्ये काम केलेली आहेत. इतरांच्या तुलनेत घरकुल ला विकास झाला नाही. त्यामुळे पुढील काळात जे जे शक्य होईल ते घरकुलच्या विकासासाठी मी काम करत राहणार आहे असे सुरेश जाधव यांनी सांगितले.
या कार्यक्रमासाठी सुरेश विठ्ठल जाधव, अशोक मगर, संतोष माळी, प्रशांत ससाने, लक्ष्मण देसाई, सुरज देशमाने इत्यादी मान्यवर हजर होते.
यावेळी सोसायटी अध्यक्ष सुनिल रामकृष्ण सोनवणे, मुबारक मुलांनी, नारायण कदम, सुदाम वाघ, शरद नरूटे, इत्यादी नागरिक व महिला मोठ्या संख्येने हजर होते.
हेही वाचा :
संतापजनक : चौथीत शिकणाऱ्या तीन मुलींचा शिक्षकाकडून विनयभंग
ड्रायव्हींग लायसन्सच्या ‘स्मार्ट कार्ड’ रूपांतरणासाठी १५ सप्टेंबरपर्यंत मुदत
धक्कादायक : एसी दुरुस्त करताना स्फोट; एकाचा मृत्यू, एक गंभीर जखमी
बॉम्बे उच्च न्यायालय अंतर्गत विविध पदांसाठी भरती
ब्रेकिंग : मलायकाच्या वडिलांची इमारतीवरून उडी मारून आत्महत्या
शेतात काम करताना विद्युत तारेचा स्पर्श, चार शेतकऱ्यांचा दुर्दैवी मृत्यू
JCI : ज्यूट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया अंतर्गत विविध पदांची भरती