Thursday, May 9, 2024
Homeताज्या बातम्याआगीतून वाचण्यासाठी रेल्वेतून उड्या; झारखंडमध्ये १२ जणांना ट्रेनने उडवले, दोघांचा मृत्यू

आगीतून वाचण्यासाठी रेल्वेतून उड्या; झारखंडमध्ये १२ जणांना ट्रेनने उडवले, दोघांचा मृत्यू

जामतारा : झारखंड राज्यातील जामतारा येथून एक मोठी बातमी येत आहे. जामतारा-करमाटांर येथे कलझारियाजवळ दोघांचा मृत्यू झाला आहे. रेल्वे अपघातामध्ये दुर्दैवाने त्यांचा मृत्यू झाला.शिवाय १२ प्रवाशी जखमीदेखील आहेत.अंग एक्स्प्रेसला आग लागल्याची माहिती मिळाल्यानंतर प्रवाशांनी ट्रेनमधून उड्या मारल्या. तेवढ्यात समोरुन आलेल्या झाझा-आसनसोल या ट्रेनने प्रवाशांना धडक दिली. काही प्रवाशांना ट्रेनने धडक दिली. याच घटनेत दोन जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. तर १२ जण जखमी झाले.Breaking news: Jump from train to escape fire; 12 killed by train in Jharkhand

घटनास्थळी रेल्वे प्रशासन, रेल्वे पोलिस आणि स्थानिक प्रशासनाचे अधिकारी पोहोचले असून बचावकार्य सुरु आहे. अंग एक्स्प्रेसमध्ये आग लागल्याची माहिती मिळाल्यानंतर ट्रेनला अचानक थांबवण्यात आलेलं होतं. तेवढ्यात घाबरलेल्या प्रवाशांनी ट्रेनमधून उड्या मारल्या. दुर्दैवाने समोरुन येणाऱ्या झाझा-आसनसोल ही गाडी प्रवाशांना चिरडून निघून गेली.अपघातामध्ये मृत पावलेल्यांची ओळख पटवण्याचं काम सुरु झालं आहे. रात्री ९ वाजेपर्यंत दोन जणांची ओळख पटवण्यात आलेली होती. एकाचं नाव मनिष कुमार असल्याचं सांगितलं जातंय. त्याचं आधार कार्ड रेल्वे ट्रॅकवर सापडलं आहे. दुसरं नाव सिकंदर कुमार असून त्याच्या वडिलांचं नाव आदिकाल यादव असं आहे. तो धपरी झाझा जमुई येथील रहिवाशी आहे.

घाबरुन उड्या मारल्याने अपघात?
एक्सप्रेस ट्रेनमध्ये आग लागल्याची सूचना मिळाल्याने गाडीत एकच गोंधळ उडाला. घाबरलेल्या प्रवाशांनी जीव वाचण्यासाठी खाली उड्या मारायला सुरुवात केली. दरम्यान, समोरून येणारी झाझा-आसनसोल पॅसेंजर गाडीने रुळांवरून पडलेल्या प्रवाशांना चेंगरलं. अपघातानंतर अंग एक्स्प्रेसला थांबवण्यात आलं आहे.

नेमकं काय घडलं?
बंगळुरू-यशवंतपूर एक्स्प्रेस डाऊन लाईनवरुन जात होती. त्याचवेळी रेल्वेरूळाच्या शेजारी टाकलेल्या भरावाची धूळ उडाली. हे पाहून आग लागल्याने धूर निघत असल्याचा चालकाचा समज झाला. संभाव्य धोका टाळण्यासाठी त्याने गाडी थांबवली. अचानक आग लागल्याची गाडीत अफवा पसरली. त्यामुळे डब्यात गोंधळ उडाला. जीव वाचवण्यासाठी प्रत्येकजण दरवाच्या दिशने धावू लागला. यात कोणताही विचार न करता प्रवाशांनी धडाधड उड्या टाकल्या. त्याचवेळी समोरून येणाऱ्या ईएमयू ट्रेनने प्रवाशांना चिरडलं.

रेल्वेने आरोप फेटाळला
दुसरीकडे, रेल्वेकडून सांगण्यात येत आहे की, चेन पुलिंगमुळे ट्रेन थांबवण्यात आली होती, त्यामुळे रुळ ओलांडणाऱ्या लोकांना समोरून येणाऱ्या ट्रेनने उडवले. सध्या फक्त दोन जण गंभीर जखमी असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. यात आगीची कोणतीही घटना घडलेली नाही. सध्या दोघांच्या मृत्यूची पुष्टी झाली आहे. मृत हे प्रवासी नसून ते रुळावरून चालत होते. या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी 3 सदस्यीय JAG समिती स्थापन करण्यात आली आहे, अशी माहिती पूर्व रेल्वेचे CPRO कौशिक मित्रा यांनी दिली आहे.

हेही वाचा :

Nilesh Rane : निलेश राणे यांच्यावर पुणे महापालिकेची मोठी कारवाई

ब्रेकिंग: निवेदनावर मुख्यमंत्री शिंदेंची खोटी सही, शिक्के वापरल्याचा धक्कादायक प्रकार

धक्कादायक : शालेय पोषण आहारात मेलेल्या उंदराचे अवशेष, 10 विद्यार्थ्यांना विषबाधा

ब्रेकिंग : हजारो आदिवासींचे आंदोलन; रस्त्यावरच पेटवल्या चूली

माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील राष्ट्रवादीच्या वाटेवर ?

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय