मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसमधील ९ नेत्यांनी बंडखोरी करत शिंदे – फडणवीस सरकारमध्ये २ जुलै रोजी मंत्रीपदाची शपथ घेतली. यानंतर राष्ट्रवादी मध्ये उभी फूट पडल्याचे दिसत आहे. काही नेते खासदार शरद पवार यांच्यासोबत आहेत, तर काही नेते उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गटात आहेत. या फुटीनंतर आता पक्षात मोठे बदल करण्यात येत आहेत.
खासदार अमोल कोल्हे यांना महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीचे प्रचार प्रमुख पदी नियुक्ती करण्यात आली आहे. या संदर्भात राष्ट्रवादीच्या ट्विटर हँडलवरुन ही माहिती देण्यात आली आहे.
खासदार अमोल कोल्हे हे अजित पवार यांच्या मंत्रिपद शपथविधी सोहळ्याला उपस्थित होते, पण दुसऱ्याच दिवशी त्यांनी खासदार शरद पवार यांची भेट घेतली. यानंतर त्यांनी आपण शरद पवार यांच्यासोबत असल्याचे जाहीर केले. काही दिवसापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचा वाय.बी.चव्हाण सेंटरमध्ये मेळावा झाला होता. यावेळी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी कोल्हे यांनी पक्षाच्या प्रचार प्रमुखाची ऑफर दिली होती.
आज प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या हस्ते खा. डॉ. अमोल कोल्हे यांना सदर नियुक्तीचे पत्र सुपूर्द करण्यात आले. यावेळी राष्ट्रीय कार्याध्यक्ष व महाराष्ट्र प्रभारी खा. सुप्रियाताई सुळे, कोषाध्यक्ष माजी आमदार हेमंत टकले, पालघर जिल्हा अध्यक्ष आमदार सुनील भुसारा, प्रदेश सरचिटणीस अदिती नलावडे, प्रदेश सरचिटणीस संदीप बेडसे, मुंबई कार्याध्यक्ष राखी जाधव, युवक प्रदेश अध्यक्ष महेबूब शेख, विद्यार्थी प्रदेश अध्यक्ष सुनील गव्हाणे, युवक प्रदेश उपाध्यक्ष अमोल मातेले हे उपस्थित होते.
हे ही वाचा :
‘एकनाथ शिंदे यांच्यासह १६ आमदार अपात्रता होणार…’ विधान विधानसभेच्या उपाध्यक्षचं वक्तव्य
ब्रेकिंग : १२ आमदारांबाबत उद्या सर्वोच्च न्यायालयात सुनावणी
खळबळजनक : ऑनलाइन जंगली रमी हरल्याने पुण्यात तरूणाची आत्महत्या
ऐकावे ते नवलच : टोमॅटोच्या सुरक्षेसाठी दुकानावर चक्क बाऊन्सर तैनात
टोमॅटोने मोडले आता पर्यतचे पेट्रोल डिझेलचे सर्व रेकॉर्ड, अनेक शहरांत टोमॅटो 150 पार
ऑनलाईन गेम खेळताना प्रेम जडलं, 4 मुलांची आई प्रियकरासाठी थेट पाकिस्तानातून भारतात
अखेर ‘आदिपुरुष’ चित्रपटाच्या लेखकाने मागितली प्रेक्षकांची जाहीर माफी
धक्कादायक : मंत्र्यांच्या स्वागतासाठी आश्रमशाळेच्या विद्यार्थ्यांना तब्बल दोन तास रस्त्यावर केले उभे