Friday, November 22, 2024
Homeराज्यब्रेकिंग : ग्राहकांना महागाईचा पुन्हा झटका, घरगुती एपीजी गॅसच्या किंमतीत मोठी वाढ

ब्रेकिंग : ग्राहकांना महागाईचा पुन्हा झटका, घरगुती एपीजी गॅसच्या किंमतीत मोठी वाढ

मुंबई, ६ जुलै : महागाईने होरपळणाऱ्या सर्व सामान्य जनतेला पुन्हा एकदा भुर्दंड बसणार आहे. घरगुती एलपीजी सिलिंडरच्या (LPG Cylinder) किंमती पुन्हा एकदा वाढ करण्यात आली आहेत. घरगुती एलपीजी सिलिंडरच्या किंमतीत ५० रुपयांनी वाढ करण्यात आली आहे.

दर महिन्यात सिलेंडरच्या दरात सारखी वाढ होत असताना जुलैच्या देखील पहिल्याच आठवड्यात ग्राहकांना महागाईचा झटका बसला आहे. घरगुती १४.२ kg गॅस सिलेंडर्सच्या किंमतीमध्ये आजपासून (६ जुलै) ५० रूपयांची वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे सिलेंडर घेण्यासाठी आता १ हजार रुपयांपेक्षा जास्त पैसे मोजावे लागणार आहे. दिल्लीत १४ kg एलपीजी सिलेंडरची किंमत १०५३ रुपये आहे. तर मुंबईत १०५२.५० रुपये मोजावे लागणार आहे. तर ५ किलोचा घरगुती गॅस सिलेंडर 18 रूपये प्रति सिलेंडरने महागला आहे. या आधी १ एप्रिल रोजी १९ किलोच्या कमर्शियल एलपीजी दरात 250 रुपयांची वाढ करण्यात आली होती.

आपल्या शहरातील गॅस सिलिंडरचे दर जाणून घ्यायचे असतील तर https://iocl.com/Products/IndaneGas.aspx या सरकारी तेल कंपनीच्या वेबसाइटवर जाऊन तुम्हाला पाहता येणार आहे. इथे कंपन्या दर महिन्याला नवे दर जारी करते.

संबंधित लेख

लोकप्रिय