Friday, April 26, 2024
Homeजुन्नरब्रेकिंग : माजी आमदार शरद सोनवणे यांनी जिल्हाप्रमुख पद सोडले

ब्रेकिंग : माजी आमदार शरद सोनवणे यांनी जिल्हाप्रमुख पद सोडले

जुन्नर / आनंद कांबळे : माजी आमदार शरद सोनवणे यांनी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख पद सोडण्याचा निर्णय एका पत्राद्वारे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना कळविले. एकीकडे माजी खासदार शिवाजी आढळराव पाटील यांनी उद्या लांडेवाडी येथील निवासस्थानी कार्यकर्त्यांची तातडीची बैठक बोलावली असताना शरद सोनवणे यांनी घेतलेला निर्णय सध्या गुलदस्त्यात पडणारा आहे. त्यामुळे वेट आणि वाँच अशी सध्या त्यांची भूमिका दिसत आहे. त्यामुळे माजी आमदार शरद सोनवणे आणि माजी खासदार शिवाजी आढळराव पाटील हे शिंदे गटात सामील होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

उध्दव ठाकरे यांना लिहिलेल्या पत्रात शरद सोनवणे यांनी म्हटले आहे, की मागील दोन वर्षापासून आपण मला पुणे जिल्हा प्रमुख पदाची जबाबदारी दिली आहे. एक शिव सैनिक म्हणुन मी आपला प्रथमतः ऋणी आहे. मागील तीन वर्षा पासून आपले सरकार आले आणि भारतीय जनता पार्टी सोबत आपली ४५ वर्षा पासून ची जि युती होती ती आपापसातल्या भांडण मुळे तीयुती तुटून आपण महाविकास आघाडी सरकार स्थापनेचा निर्णय घेतला. परंतु पश्चिम महाराष्ट्रात महाविकास आघाडी मुळे शिवसैनिक खचत व संपत चालला होता.

पुढे ते म्हणतात, काही दिवसा पूर्वी आम्ही आपणांस भेटलो असताना तुम्ही आम्हास सांगितले कि नाइलाजाने आपल्याला कुठल्याही परिस्थितीत राष्ट्रवादीशी तडजोड करून इथून पुढच्या काळात काम करावे लागेल. साहेब आपलं वरच्या पातळीचे राजकारण वेगळे आहे पण खाली तळागाळातील सर्व सामान्य कार्यकर्त्यांचं राजकारण हे नेहीमच संघर्षाच राहिलेल आहे, त्यामुळे स्थनिक पातळीवर राष्ट्रवादीशी आमचं मनोमिलन होणार नाही, त्यामुळे मी आपल्या पदाचा सन्मान ठेऊन माझे जिल्हा प्रमुख पद आपल्या कडे पुन्हा सुपूर्द करत आहे आणि सर्वसामन्य जनतेच्या हितासाठी मी पुन्हा एकदा कार्यरत राहणार आहे.

तसेच हि जिल्हा प्रमुख पदाची जबाबबदारी आपण दुसऱ्या कुणालाही द्यावी साहेब, इच्छा नसताना मी आपल्या पासून बाजूला होत आहे, असेही पत्रात म्हटले आहे.

तसेच ते पुढे म्हणतात, “साहेब, आपल्यावर नारजी नाही पण आपण घेतलेल्या निर्णयामुळे नाराजी आहे. आम्ही जनहितासाठी पुढील कामाला सुरुवात करत आहोत. असेही म्हटले आहे.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय