Friday, November 22, 2024
Homeराज्यब्रेकिंग : आशा व गटप्रवर्तक पुन्हा संपावर जाणार; सरकारने आश्वासन न पाळल्याने...

ब्रेकिंग : आशा व गटप्रवर्तक पुन्हा संपावर जाणार; सरकारने आश्वासन न पाळल्याने निर्णय

मुंबई : राज्यातील आशा व गटप्रवर्तक पुन्हा एकदा संपावर जाणार आहेत. 29 डिसेंबर पासून आशा व गटप्रवर्तकांनी ऑनलाइन कामावर बहिष्कार घातलेला आहे व 12 जानेवारी 2024 पासून म्हणजे उद्यापासून पूर्णपणे काम बंद ठेवून बेमुदत संप करण्यात येणार असल्याची माहिती सिटू संलग्न महाराष्ट्र आशा व गटप्रवर्तक फेडरेशन च्या अध्यक्षा कॉ.आनंदी अवघडे, महासचिव कॉ.पुष्पा पाटील, खजिनदार कॉ.अर्चना घुगरे यांनी दिली.

18 ऑक्टोबर पासून 9 नोव्हेंबर पर्यंत आशा व गटप्रवर्तकांनी जो संप केला या संपाच्या काळात सरकारने मानधन वाढीचे आश्वासन दिले होते. त्याचा जीआर सरकारने काढलेला नाही आणि अजून काढण्याची लक्षणे सरकारची दिसत नाहीत आणि त्यामुळे हा संप नाविलाजाने करावा लागत आहे असेही संघटनेने म्हटले आहे.

संपाच्या मागण्या पुढीलप्रमाणे :

1. आशा स्वंयसेविका व गटप्रवर्तकांना दिवाळी भेट रु.२००० दिवाळीपूर्वी देण्यात येणार.

2. आशा स्वंयसेवकांच्या मोबदल्यात रु.७००० ची वाढ तत्काळ करा 

3. गटप्रवर्तकांच्या मोबदल्यात रु.१०००० ची वाढ तत्काळ करा.  

वरील मागण्यांचा जीआर तत्काळ काढण्यात यावी, अशी आशा व गटप्रवर्तकांची मागणी केली 

“अशी” असेल आंदोलनाची दिशा  

1) 12 जानेवारी – पंतप्रधान नरेंद्र मोदी हे नाशिक दौऱ्यावर आहेत. त्यांना भेटण्यासाठी हजारो आशा व गटप्रवर्तक नाशिक ला जाणार.

2) 17 जानेवारी – आझाद मैदान मुंबई येथेही आशा व गटप्रवर्तकांचा विराट मोर्चा होणार.

3) 12 व 17 जानेवारी – जिल्हा, तालुका पातळीवर तीव्र आंदोलने करणार.

संबंधित लेख

लोकप्रिय