मुंबई : एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यासह शिवसेनेच्या अनेक आमदारांनी बंड केल्याने शिवसेनेने हकालपट्टीचं सत्र सुरू केले आहे. अशात एकनाथ शिंदे यांना शुभेच्छा दिल्याने शिवसेनेचे माजी खासदार शिवाजी आढळराव पाटील यांच्यावर पक्ष हाकलपट्टीची कारवाई करण्यात आली होती ही कारवाई आता मागे घेण्यात आली आहे.
माजी खासदार शिवाजी आढळराव पाटील यांच्यावर पक्ष विरोधी कारवाई केल्याचा ठपका ठेवण्यात आला होता. आढळराव पाटील यांनी, महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्री पदावर एकनाथ शिंदे यांची नियुक्ती झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन केले होते. या फोटोवर शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांचा फोटो टाकण्यात आला नव्हता. तसेच त्यांनी एकनाथ शिंदे यांचा फोटो शेअर करत गर्जत राहिल आवाज हिंदुत्वाचा असेही त्यांच्या फोटोवर लिहले होते. आता शिवसेनेकडून शिवाजीराव आढळराव पाटील यांच्यावरील कारवाई शिवसेनेकडून मागे घेण्यात आली आहे.
दरम्यान, आढळराव पाटलांवरची कारवाई मागे घेण्यात आली असून हे शिवसेनेचे मुख्यपत्र असलेल्या सामनातून अनावधानानं बातमी दिल्याची माहिती देण्यात आली आहे, असे सांगण्यात आले आहे.