Monday, May 20, 2024
Homeआंतरराष्ट्रीयब्रेकिंग : बांगलादेशच्या राजधानीत भीषण,आग 44 ठार 22 जखमी

ब्रेकिंग : बांगलादेशच्या राजधानीत भीषण,आग 44 ठार 22 जखमी

ढाका : दि.01: बांगलादेशची राजधानी ढाका येथील बेली रोडवर सात मजली इमारतीला आग लागल्याची माहिती समोर आली आहे.येथील सात मजली इमारतीत गुरुवारी रात्री ९.३० च्या सुमारास भीषण आग लागली. या इमारतीच्या पहिल्या मजल्यावर असलेल्या एका हॉटेल मध्ये लागलेल्या आगीने भीषण रूप धारण केले.काही वेळातच आग इमारतीच्या वरच्या मजल्यापर्यंत पसरू लागली.

ही आग दुसऱ्या मजल्यावर पोहचली. येथे असलेल्या एका कापडाच्या दुकानाला या आगीने वेढा दिला.त्यामुळे आग मोठ्या प्रमाणात भडकली. दरम्यान,काही नागरिकांनी तातडीने इमारती बाहेर पळ काढला.तर जे बाहेर पडू शकले नाही त्यांचा जळून मृत्यू झाला.

या घटनेत आतापर्यंत 44 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 22 जण गंभीर जखमी झाले असून मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

या लोकांना इमारतीबाहेर काढण्यात आले. अग्निशमन दलाच्या 13 गाड्या घटनास्थळी हजर असल्याचे सांगण्यात येत आहे.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय