Sunday, May 19, 2024
Homeपुणे - पिंपरी चिंचवडबोरघाट-मुंबई पुणे ट्रॅफिक जाम

बोरघाट-मुंबई पुणे ट्रॅफिक जाम

पुणे / क्रांतिकुमार कडुलकर : मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील बोरघाट येथे वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याने वाहतूक विस्कळीत झाली आहे. ख्रिसमस आणि नवीन वर्षाच्या सुट्ट्यांमुळे अनेक पर्यटक घराबाहेर पडले आहेत. एक्स्प्रेस वेवर वाढलेली वाहनांची संख्या आणि बोरघाटात सुरू असलेली रस्त्याची कामे यामुळे वाहनधारकांना शुक्रवारी रात्रीपासून वाहतूककोंडीला सामोरे जावे लागले. पर्यटकांची संख्या वाढल्याने पुणे लेनवर बोरघाट पोलीस चौकी दस्तुरी, अमृतांजन पूल ते खंडाळा बोगदा आणि खंडाळा एक्झिट ते नवीन अमृतांजन पूल दरम्यान मुंबई बाजूने वाहनांच्या पाच ते सहा किलोमीटर लांब रांगा लागल्या होत्या.

शनिवारी सुमारे दोन तास वाहतूक ठप्प झाल्याने प्रवासी व वाहनचालकांचे हाल झाले. खंडाळा आणि लोणावळ्यात महामार्गावर वाहनांच्या रांगा लागल्या. वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी बोरघाट, खंडाळा महामार्ग पोलीस कार्यरत आहेत. बोरघाट (दस्तुरी), खंडाळा येथील वाहतूक पोलीस वाहतूक सुरळीत करताना कामी आले. दरम्यान, पोलिसांनी वाहतूक पर्यायी मार्गाने विरुद्ध मुंबईकडे वळवली.

Lic
संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय