Friday, May 17, 2024
Homeविशेष लेखपुस्तक - 'विडीची गोष्ट' : विडी उद्योगाचा लेखाजोखा

पुस्तक – ‘विडीची गोष्ट’ : विडी उद्योगाचा लेखाजोखा

सिन्नर तालुक्यातील विडी उद्योगाचा लेखाजोखा मांडणारे ‘विडीची गोष्ट’ हे पुस्तक प्रा. डॉ. शंकर बोऱ्हाडे यांनी लिहिले आहे. या पुस्तकात सिन्नर तालुक्याचा आणि विडी उद्योगाचा इतिहास लेखकाने मांडलेला आहे.

साधारण सव्वाशे वर्षांपूर्वी सुरु झालेला विडी उद्योग आणि या उद्योगातील स्थितीगतीचा आलेख या पुस्तकात वाचायला मिळतो. सिन्नरमधील विडी कारखानदार, त्यांचे वेगवेगळे ट्रेडमार्क आणि त्यांच्या वाटचालीचे शब्दचित्र लेखकाने आपल्या खास शैलीत रेखाटले आहे. तत्काळात हजारोंना रोजगार देणाऱ्या पण आज विस्मृतीतील गेलेल्या काही विडी कारखानदारांचा शोधही लेखकाने या पुस्तकात घेतला आहे. विडी उद्योगातील कामगार चळवळी, कामगार नेते यांची बहारदार व्यक्तिचित्रे या पुस्तकात शब्दबद्ध आहेत.  

सिन्नरसारखे गाव, या गावाची विडी उद्योगाकडे झालेली वाटचाल, विडी उद्योगातील चढ- उतार यांचे दस्तऐवजीकरण पुस्तकात आहे. सिन्नर तालुक्यातील विडी उद्योगाच्या निमित्ताने विविध घडामोडींचा परामर्श हे या पुस्तकाचे आणखी एक वैशिष्ट्य दिसून येते.

लोकवाङ्मय गृहाने प्रकाशित केलेल्या या पुस्तकाची प्रकाशनपूर्व नोंदणी सुरु झालेली असून २४८ पानांच्या या पुस्तकाची किंमत रुपये २५० आहे. प्रकाशनपूर्व नोंदणी केल्यास हे पुस्तक मात्र १५० रुपयांत मिळेल.

पुस्तकासाठी संपर्क : राजू देसले: ७०६६६६९८९४

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय